लंडन, 1 ऑक्टोबर : चोर ( thief) शेवटी चोरच असतो. तो प्रामाणिक असता तर तो चोर बनला नसता. त्यामुळे चोरांबद्दल आपलं मत कधीही चांगलं होणार नाही; पण युनायटेड किंग्डममधल्या या चोरांच्या प्रामाणिकपणामुळे तुमचंही मन हेलावेल. चोरांनाही काही तरी माणुसकी असू शकते याचीही जाणीव होईल. युनायटेड किंग्डममधल्या (United Kingdom) कॉर्नवॉल काउंटीमध्ये ( Cornwall County) एक घटना घडली. या घटनेत चोरांच्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय आला. इथल्या 80 वर्षांच्या एका महिलेच्या घरात चोरट्यांनी दरोडा टाकला. चोरांनी (Thieves) इथं चोरीही केली; पण जाताना त्या आजीसाठी ते एक चिठ्ठी (letter) ठेवून गेले. चोरट्यांनी फक्त चिठ्ठीच ठेवली नाही, तर त्यासोबत काहीही पैसेही ठेवले. ‘तुम्ही नेहमी आनंदी आणि सुरक्षित राहा,’ असं या चिठ्ठीत चोरट्यांनी लिहिलं होतं. याबाबतचं वृत्त ‘झी न्यूज’ने दिलं आहे. ‘द सन’च्या वृत्तानुसार, वृद्ध महिला घरात टीव्ही पाहत असताना चोरट्यांनी दरोडा घातला. चोरी करून चोरटे पळूनही गेले; पण त्यांनी एक चिठ्ठी ठेवली. या चिठ्ठीत चोरट्यांनी लिहिलं होतं, की ‘नमस्कार, तुम्ही कुणीही असाल; पण आम्ही ही फुलदाणी (Flowerpot) चोरत आहोत. कारण आम्हाला खूप गरज आहे. आम्हाला तुमची ही फुलदाणी इतकी आवडली, की आम्हाला ती नेल्याशिवाय राहवलं नाही; पण आम्ही या फुलदाणीची किंमत म्हणून 15 युरो (1289 रुपये) ठेवत आहोत. तिची किंमत साधारण तेवढीच असेल, असं आम्हाला वाटतं. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.’ हे ही वाचा- लग्नाचे फोटोज Delete करुन फोटोग्राफने काढला पळ, कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का चोरीच्या घटनेबाबत सांगताना वृद्ध महिला होली म्हणाल्या, की ‘चोरी केल्यानंतरही चोर पैसे ठेवेल यावर माझा विश्वास बसत नाही. मी यापूर्वी कुणासोबत असं घडताना पाहिलं नाही. चोरट्यांनी ती चिठ्ठी माझ्या घराच्या दाराखाली ठेवली होती.’ ‘फ्लॉवरपॉट रात्री 9.15 च्या सुमारास घरातून चोरीला गेला. तो दिवाणखान्यात ठेवलं होतं आणि तो मला खूप आवडायचा. चोरांनी तो चोरून चांगलं केलं नाही. कोणत्याही किमतीत मी तो फ्लॉवरपॉट विकणार नव्हते,’ असंही या महिलेनं सांगितलं. चोरांच्या या प्रामाणिकपणाची चर्चा शहरामध्ये होत आहे. भारतातही काही महिन्यांपूर्वी चोराच्या प्रामाणिकपणाचा असाच प्रत्यय आला होता. हरियाणातल्या जिंद येथून कोरोना प्रतिबंधक लशीचे डोस मोठ्या प्रमाणावर चोरीला गेले होते; मात्र चोराने या सर्व लशी परत केल्या. चोराने पोलिस ठाण्याबाहेर एका चहाच्या टपरीवर या लशी ठेवल्या. सोबतच एक चिठ्ठी ठेवून माफीही मागितली. ‘माफ करा. या कोरोनाच्या लशी असतील, हे माहिती नव्हतं,’ असं चोराने या चिठ्ठीत लिहिलं होतं. लशींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असल्याने या चोराने प्रामाणिकपणा दाखवला होता.