नवी दिल्ली 10 फेब्रुवारी: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ( President Barak Obama) यांची पत्नी आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी राहिलेल्या (Former First Lady) मिशेल ओबामा (Michelle Obama) लवकरच नेटफ्लिकसवर(Netflix) एक कूकींग शो (Cooking Show) लाँच करण्याच्या तयारीत आहेत. हा शो विशेषतः लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आला आहे. ओबामा “वेफल्स + मोची” (Waffles + Mochi) या शोच्या कार्यकारी निर्माता असतील. हा शो 16 मार्चपासून प्रेक्षकांना पाहाता येईल. तरुण प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी यामध्ये वेफल्स आणि मोची नावाचे दोन कठपुतले तर ओबामा सुपर मार्केटच्या मालक म्हणून झळकतील. हा शो त्यांच्या शेफ बनण्याच्या प्रवासावर आधारित असेल. यामध्ये ओबामा सुपर मार्केच्या मालकाच्या भूमिकेत असतील. तर, एक मॅजिकल फ्लाईंग कार्ट त्यांना मदत करताना दिसेल. वेफल आणि मोची वेगवेगळ्या किचन, रेस्टॉरंट, शेतं आणि जगभरातील घरांमध्ये जाऊन प्रसिद्ध शेफ, कलाकार आणि होम कूक यांच्यासोबत नवनवीन रेसीपी बनवताना दिसतील, असं नेटफ्लिसनं या कार्यक्रमाबद्दल सांगितलं. शोची थीम ओबामा यांच्या “लेट्स मुव्ह!”(Lets Move) या सार्वजनिक आरोग्य उपक्रमाप्रमाणंच आहे. याचा उद्देश बालपणीच येणारा लठ्ठपणा रोखणं हा आहे. या कार्यक्रमामुळं लोकांनी आरोग्यदायी, परवडणारे पदार्थ खावेत आणि त्यांच्या शारिरीक हलचाली वाढाव्या असा उद्देश आहे. “वॅफल्स + मोची” हा ओबामा यांच्या अनेक कार्यक्रमांपैकी एक आहे. त्यांची बिकमिंग ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर आधीपासूनच उपलब्ध आहे.तर, 2020 मध्ये त्यांनी स्पॉटीफायवर एक पॉडकास्टही(Podcast) लॉन्च केलं होतं. बराक आणि मिशेल ओबामा यांचा नेटफ्लिक्ससोबत अनेक वर्षांचा करार आहे.