Maryam Nawaz : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी आणि PLMN च्या उपाध्यक्ष मरियम नवाज यांचा मुलगा जुनैद सफदरचा आयशा सैफ खानशी झालेला विवाह चांगलाच चर्चेत आहे. या लग्नाची सजावट, वधू-वर आणि पाहुण्यांचं आदरातिथ्य हे विषय चर्चेत आहेत. पाहा PHOTOS
मरियम नवाझने मुलाच्या लग्नात परिधान केलेला लहंगा आणि तिच्या सौंदर्याची पाकिस्तानात सर्वत्र चर्चा होत आहे.
सोशल मीडियावर मरियम नवाझच्या सौंदर्याचे फार कौतुक करण्यात येत आहे. मुलाच्या लग्नात मरियम नवाजचा लहंगा, मेक-अप, दागिने पाहण्यासारखे होते.
कव्वालीच्या रात्री नेसलेली गुलाबी साडी असो, मेंदीवर नेसलेली निळी-पिवळी जोडी असो किंवा मिरवणुकीत घातलेला हिरवा लेहेंगा असो. मरियम नवाजने तिच्या मुलाच्या लग्नाच्या प्रत्येक फंक्शनसाठी डिझायनर पोशाख निवडले आहेत. विशेष म्हणजे मुलाच्या लग्नासाठी मरियम नवाझनेही एका भारतीय फॅशन डिझायनरचा ड्रेस निवडला होता.
मरियम नवाझने मुलाच्या मेहेंदीमध्ये निळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता, जो भारतातील डिझायनर अभिनव मिश्रा यांनी डिझाइन केलेला होता. मरियमच्या मुलाच्या लग्नासाठी तयार करण्यात आलेल्या लेहेंग्यात खास पद्धतीनं काम करण्यात आलेलं होतं.
मरियमच्या लेहेंगाचे सर्वत्र कौतुक होत आहे. लोक तिच्या सौंदर्याचेच नव्हे तर तिच्या डिझायनर आउटफिट्सचेही कौतुक करत आहेत.