JOIN US
मराठी बातम्या / विदेश / 24 मिनिटांत एकट्यानं संपवलं सात जणांचं जेवण, मेन्यू ऐकूनच येईल ढेकर

24 मिनिटांत एकट्यानं संपवलं सात जणांचं जेवण, मेन्यू ऐकूनच येईल ढेकर

एका व्यक्तीनं केवळ 24 मिनिटांत एवढं अन्न खाण्याचा विक्रम केला की त्यात (Man eats 9600 calories in just 24 minutes in McDonald Challenge) किमान सातजणांचं भरपेट जेवण झालं असतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 29 नोव्हेंबर: एका व्यक्तीनं केवळ 24 मिनिटांत एवढं अन्न खाण्याचा विक्रम केला की त्यात (Man eats 9600 calories in just 24 minutes in McDonald Challenge) किमान सातजणांचं भरपेट जेवण झालं असतं. एका बैठकीत सामान्य माणूस साधारणपणे किती अन्न खाऊ शकतो, या प्रश्नाचं (Limit of food consumption) प्रत्येकासाठीचं उत्तर वेगवेगळं असू शकतं. साधारणपणे मॅकडॉनल्डचे तीन मोठे बर्गर हे एका वेळी कुठल्याही व्यक्तीचं पोट भरण्यासाठी पुरेसे असतात. अनेकांना तर एक बर्गरदेखील संपवणं आव्हानात्मक वाटतं, तर काहीजण दोन बर्गर आरामात खाऊ शकतात. लंडनमध्ये मात्र एका (Man eat 6 burgers at a time) व्यक्तीनं 6 बर्गर बसल्या बैठकीला खाऊन टाकले. फक्त एवढंच नाही, तर त्यासोबत इतरही अनेक पदार्थ फस्त करत चॅलेंज जिंकलं. काय होतं चॅलेंज मॅकडॉनल्ड कंपनीकडून खिसमस चॅलेंजचं आयोजन करण्यात आलं होतं. यात कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अन्न खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 23 वर्षांच्या काईली गिब्सननं बाजी मारली. मॅकडॉनल्डच्या चॅलेंजमध्ये त्यानं केवळ 24 मिनिटांत 9600 कॅलरीज खाऊन टाकल्या. हे पदार्थ केले फस्त या चॅलेंजसाठी त्याच्यासमोर 3 फेस्टिव्ह क्रिस्पी चिकन स्टेक बर्गर ठेवण्यात आले होते. त्याशिवाय 3 फेस्टिव्ह स्टेक्स, 2 चीज शेअर बॉक्सेस, 8 फेस्टिव्ह पाई आणि 2 सेलिब्रेशन मॅकफ्लरीज ठेवण्यात आल्या होत्या. या चॅलेंजमध्ये आपल्याला बर्गरच सर्वाधिक आवडल्याची प्रतिक्रिया गिब्सननं दिली आहे. अशा प्रकारचे चॅलेंजेस तो नेहमी घेतो आणि फेसबुकवर ते लोकांशी शेअर करतो. हे वाचा-  800 वर्षांपूर्वीच्या mummy चा शोध; सांगाड्याजवळ भाजीपाला आणि हत्यारं, पाहा Photo एवढं अन्न पचतं तरी कसं? गिब्सन व्यायाम करूनच हे अन्न पचवतो. अशा प्रकारच्या चॅलेंजला येण्यापूर्वी तो व्यायाम करून येतो आणि त्यानंतर पुढचा आठवडाभर तो मुबलक व्यायाम करतो. एरवी तो लो कॅलरी आणि आरोग्यदायी अन्नच खातो. तो एक प्रोफेशनल इटर असून अनेक विक्रम त्याच्या नावावर नोंदवण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या