JOIN US
मराठी बातम्या / विदेश / रोगापेक्षा इलाजच भयंकर! इथे कोरोना होताच कंगाल होतायेत लोक; उपचाराचा खर्च जाणून चक्रावून जाल

रोगापेक्षा इलाजच भयंकर! इथे कोरोना होताच कंगाल होतायेत लोक; उपचाराचा खर्च जाणून चक्रावून जाल

इथे कोरोनाची लागण झालेले लोक वेगळ्याच संकटात सापडत आहेत. लोकांना या गोष्टीची भीती कमी आहे की कोरोना त्यांचा जीव घेईल. मात्र, त्यांना या गोष्टीची भीती आहे, की कोरोना झाल्यास उपचारासाठी पैसे कुठून आणणार?

जाहिरात

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 16 मार्च : 2019 पासून कोरोना महामारीने अक्षरशः जगभरात थैमान घातलं आहे (Corona Virus). एकापाठोपाठ एक व्हेरिएंट जगभरात पसरत आहे. डेल्टा आणि ओमायक्रॉननंतर आता चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वाढला आहे. तिथे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र तज्ज्ञांना अशी भीती आहे की भारतातही लवकरच कोरोनाची नवी लाट येऊ शकते (New Wave of Corona). यादरम्यान भारतात अनेकांचं लसीकरण (Corona Vaccination) झालं आहे. अनेक वर्षापूर्वी झालाय मालकाचा मृत्यू; आजही समुद्रकिनारी तासंतास वाट पाहतो श्वान भारताशिवाय जर आपण मलेशियाबद्दल बोलायला गेलो, तर इथे कोरोनाची लागण झालेले लोक वेगळ्याच संकटात सापडत आहेत. मलेशियातील लोकांना या गोष्टीची भीती कमी आहे की कोरोना त्यांचा जीव घेईल. मात्र, त्यांना या गोष्टीची भीती आहे, की कोरोना झाल्यास उपचारासाठी पैसे कुठून आणणार? या देशात कोरोनावरील उपचार अतिशय महागडे असून गरीबांना हे न परवडणारं आहे. नुकतंच मलेशियातील एका व्यक्तीने याबाबत ट्विट करून खुलासा केला. या व्यक्तीने सांगितलं की कशाप्रकारे उपचाराच्या नावाखाली लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे हडपले जात आहेत. ट्विटरवर Nurasyiqin नावाच्या महिलेनं याबाबत खुलासा केला. तिने लिहिलं की, कोरोनाची लागण होणं चांगलंच महागात पडतं. तिने व्यवस्थित हिशेब केला नाही मात्र कोरोना झाल्यावर तिची संपूर्ण सेव्हिंग्स संपली. भरपूर औषधं, टेस्ट किट्स आणि सप्लीमेंट्समध्ये हे पैसे खर्च झाले. काही कुटुंबांकडे तर कोरोनाची लागण झाल्यावर जेवण करण्यासाठीही पैसे उरले नाहीत. चीनमधील कोरोनाचा वाढता प्रसार भारतासाठी चिंताजनक? शास्त्रज्ञाने दिली माहिती Nurasyiqin चं हे ट्विट बघता बघता व्हायरल झालं. यानंतर अनेकांनी याठिकाणी आपले अनुभवही शेअर केले. मलेशियातील अनेकांनी हे अगदी खरं असल्याचं सांगितलं. एका व्यक्तीने लिहिलं की कोरोनाच्या उपचारासाठी त्याला आपली संपत्ती विकावी लागली. कोरोनाची लागण झाल्यावर त्याच्या उपचारासाठी पैसे खर्च करूनच सगळ्यांची अवस्था बिकट होत आहे. या देशात कोरोना चाचणी करण्यासाठीही सुमारे 23 हजार रूपये मोजावे लागतात. मलेशियातून समोर आलेली ही बातमी जाणून सगळेच हैराण झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या