JOIN US
मराठी बातम्या / विदेश / जगातलं सगळ्यात महागडं फळ! एका किलोच्या किंमतीत येईल अंगभर सोनं

जगातलं सगळ्यात महागडं फळ! एका किलोच्या किंमतीत येईल अंगभर सोनं

असं एक फळ आहे, ज्याच्या किंमतीत (Know about costliest fruit in the world) अनेक तोळं सोनं, आयफोन आणि इतर चैनीच्या वस्तू मिळू शकतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

असं एक फळ आहे, ज्याच्या किंमतीत (Know about costliest fruit in the world) अनेक तोळं सोनं, आयफोन आणि इतर चैनीच्या वस्तू मिळू शकतात. भारतात अनेक (Various types of fruits) प्रकारची फळं उपलब्ध असतात. त्यातील काही फळं ही अगदी सर्वत्र उपलब्ध असतात. त्यामध्ये संत्री, मोसंबी, केळी, सफरचंद, द्राक्षं यासारख्या फळांचा समावेश होतो. फळांच्या किंमतीची रेंज भारतात फळांच्या किंमतीची मोठी रेंज आहे. अगदी पाच-दहा रुपयांपासून फळं मिळायला सुरुवात होते. काही फळं शंभर ते दोनशे रुपये किलो दराने मिळतात, तर काही फळांसाठी पाचशेच्याही वर रुपये मोजावे लागतात. काही फळं तर बाराशे ते पंधराशे रुपये किलो दरानं विकली जातात. मात्र जगात असं एक फळ आहे, ज्याची किंमत लाखोंच्या घरात आहे. हे फळ इतकं महाग आहे की त्याच्या किंमतीत तुम्ही सोनं विकत घेऊन शकता. मात्र हे फळ भारतात पिकत नाही. लाखोचं फळ लाखोंमध्ये विकलं जाणारं हे फळ पिकतं जपान या देशात. या फळाचं नाव आहे युबरी (Yubari melon). हे जगातलं सर्वाधिक महागडं फळ मानलं जातं. काही दिवसांपूर्वीच दोन युबरींचा लिलाव करण्यात आला होता. अर्ध्या अर्ध्या किलोच्या या युबरी विकून उत्पादकाला वीस लाख रुपये मिळाले. पण हे फळ फक्त जपानमध्ये पिकतं आणि त्याचं प्रमाण अगदीच कमी असतं. हे वाचा- औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इथे नोकरीची संधी; थेट होणार मुलाखत किंमत वाढूनही प्रतिसाद भारतात ज्याप्रमाणं कलिंगडं पिकतात, त्याच प्रकारचं हे फळ असतं. मात्र या फळाला जपानमध्ये लाखोंची किंमत मिळते. एवढी किंमत वाढूनही त्याची मागणी कमी होत नाही. त्यामुळे या फळाला श्रीमंतांचं फळ म्हटलं जातं. गरीबांना हे फळ विकत घेणं परवडत नाही. हे फळ सामान्य वातावरणात शेतात उगवत नाही. त्यासाठी ग्रीन हाऊसमध्ये विशिष्ट तापमानातच त्याची वाढ होणं गरजेचं असतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या