JOIN US
मराठी बातम्या / विदेश / अमेरिकेच्या 'बायो लॅब'मध्ये तयार झाला कोरोना व्हायरस, चीन आणि रशियाचा खळबळजनक आरोप

अमेरिकेच्या 'बायो लॅब'मध्ये तयार झाला कोरोना व्हायरस, चीन आणि रशियाचा खळबळजनक आरोप

जगातल्या विविध देशांमध्ये अमेरिकेच्या 25 ‘बायो लॅब’ आहेत. तिथे विषाणुंवर संशोधन केलं जातं. मात्र त्याविषयी फारशी माहिती अमेरिका कधीच बाहेर येऊ देत नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवा दिल्ली 18मे:  कोरोना व्हायरसमुळे सगळं जग हादरून गेलं आहे. जगातल्या 190 देशांमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाची सुरुवात ही चीनमध्ये झाली असल्याने सर्व जगातून चीनवर आरोप होत आहे आणि सांशकतेनेही बघितलं जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर उघडपणे हा चायना व्हायरस असल्याचं म्हटलं आहे. आणि सातत्याने चीनवर आरोपही केले आहेत. आता चीन आणि रशियाने एकत्र येत अमेरिकेवर पलटवार केलाय. अमेरिकेच्या ‘बायो लॅब’मध्येच हा व्हायरस तयार झाल्याचा आरोप या देशांनी केला असून खळबळ उडवून दिली आहे. या लॅब्सच्या चौकशीची मागणीही त्यांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमेरिका सातत्याने चीनवर आरोप करत असल्याने त्याला उत्तर देण्यासाठी चीनने पूर्ण तयारी केली आहे. त्याच्या मदतीला रशिया आणि इराणही आल्याने आता संशयाचं भूत अमेरिकेविरुद्ध उभं करण्याचा या देशांचा प्रयत्न आहे. जगभर पसरलेल्या अमेरिकेच्या ‘बायो लॅब’मध्ये हा व्हायरस तयार करण्यात आल्याचा आरोप या देशांनी केलाय. या लॅब्सच्या चौकशीची परवानगी देऊन अमेरिकेने आपलं निर्दोषत्त्व सिद्ध करावं अशी मागणीही चीन आणि रशियाने केली आहे. अमेरिकेने या लॅब्सच्या चौकशीची मागणी करून आपलं जबाबदारी ओळखावी असंही चीनने म्हटलं आहे. जे देश सातत्याने चीनविरूद्ध आरोप करत आहेत त्यांच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयांमध्ये खटला दाखल करण्याची धमकीही चीनने दिली आहे. कोरोनाला हरवणं शक्य! ‘ही’ औषधं वापरून 4 दिवसांत डॉक्टरांनी बरे केले 60 रुग्ण अमेरिकेशीवाय जगातल्या विविध देशांमध्ये अमेरिकेच्या 25 ‘बायो लॅब’ आहेत. तिथे विषाणुंवर संशोधन केलं जातं. मात्र त्याविषयी फारशी माहिती अमेरिका कधीच बाहेर येऊ देत नाही. आता त्याच लॅब्सबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. मास्क घालून धावत होता तरूण, काही मिनिटांत फुटली फुफ्फुसं

 या आरोपांमुळे अमेरिका आणि चीन-रशियामध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता असून आंतरराष्ट्रीय राजकारणात त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या