JOIN US
मराठी बातम्या / विदेश / पुढच्या आठवड्यापासून 'या' देशात मास्क घालण्याची गरज नाही, देशात Omicron चा उच्चांक

पुढच्या आठवड्यापासून 'या' देशात मास्क घालण्याची गरज नाही, देशात Omicron चा उच्चांक

दोन महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेल्या कोरोनानं (Corona Virus) पुन्हा एकदा जगभर थैमान घातला आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळून आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे (omicron variant) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 20 जानेवारी: दोन महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेल्या कोरोनानं (Corona Virus) पुन्हा एकदा जगभर थैमान घातला आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळून आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे (omicron variant) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नवीन व्हेरिएंट आढळून आल्यानंतर कोरोनाचे रुग्ण (Corona patients) वाढत चालले आहेत. अशातच इंग्लंडमध्ये नवा नियम काढण्यात आला आहे. इंग्लंडमध्ये (England) पुढील आठवड्यापासून लोकांना मास्क घालण्याची (wear masks) गरज नाही. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी बुधवारी कोविडशी संबंधित नियम शिथिल करण्याची घोषणा केली. पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी सांगितले की, शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरिएंटची लाट देशभरात शिगेला पोहोचली आहे. यादरम्यान सेल्फ-आयसोलेशनसाठी जारी केलेल्या कठोर नियमांचे रिन्यू न करण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. सध्याचे सेल्फ आयसोलेशन नियम मार्चमध्ये संपत आहेत. टीम इंडियातील अर्धा डझन खेळाडू Corona पॉझिटिव्ह, जाणून घ्या मेडिकल स्टेट्स दरम्यान हाऊस ऑफ कॉमन्समधील खासदारांना दिलेल्या निवेदनात पंतप्रधान म्हणाले होते की, नाइटक्लब आणि मोठ्या कार्यक्रमांमध्ये प्रवेश करण्यासाठी कोविड पासपोर्टची आवश्यकता रद्द केली जाईल. दरम्यान संघटनेस हवे असल्यास ते NHS COVID पास वापरू शकतात. लोकांना घरून काम करण्याचा सल्ला दिला जाणार नाही. फेस मास्कची गरज भासणार नाही, मात्र लोकांना बंद किंवा गर्दीच्या ठिकाणी चेहरा कव्हर करण्याचा सल्ला दिला जात आहे. पीएम ने यह भी कहा कि सरकार का इरादा कोविड संक्रमित होने वालों को अपने आप आइसोलेट होने में कानूनी जरूरतों को खत्म करने का है. (फ़ाइल फोटो) याशिवाय गुरुवारपासून माध्यमिक शाळेतील मुलांना वर्गात मास्क घालावे लागणार नाही. पीएम जॉन्सन म्हणाले होते की, येत्या काही दिवसांत इंग्लंडमधील प्रवासी नियम आणि केअर होम व्हिजिटबाबत निर्बंध शिथिल केले जातील. Diet For Control Thyroid: थॉयराइडच्या त्रासावर हे घरगुती उपाय ठरतील रामबाण! रोजच्या ताटातच आहेत या गोष्टी   कोविडची लागण झालेल्यांना सेल्फ आयसोलेशनच्या कायदेशीर गरजा दूर करण्याचा सरकारचा मानस आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. त्यांनी सांगितले की ते सल्ला आणि मार्गदर्शनाने बदलले जाईल. सेल्फ-आयसोलेशनसाठी जारी केलेले नियम 24 मार्च रोजी संपत आहेत. इंग्लंडसाठी प्लॅन B उपाय

आरोग्य सचिव साजिद जावेद यांनी डाऊनिंग स्ट्रीट पत्रकार परिषदेत सांगितले की, हा एक असा क्षण आहे ज्याचा आम्हाला अभिमान वाटू शकतो. ते म्हणाले, ही एक आठवण आहे की जेव्हा आपण एकत्र काम करतो तेव्हा देश ध्येय गाठू शकतो. पण ते असेही म्हणाले की, ती फिनिश लाइन किंवा अगदी अंतिम रेषा मानली जाऊ नये. कारण व्हायरस आणि भविष्यातील व्हेरिएंट्स नष्ट करता येणार नाहीत. जावेद म्हणाले की, याऐवजी ज्या प्रकारे आपण फ्लूसोबत जगायला शिकलो, त्याच पद्धतीने कोविडसोबत जगायला शिकले पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या