JOIN US
मराठी बातम्या / विदेश / जगातली सर्वात जलद आणि स्वस्त टेस्ट किट तयार, केवळ 1 मिनिटांत असं होणार कोरोनाचं निदान

जगातली सर्वात जलद आणि स्वस्त टेस्ट किट तयार, केवळ 1 मिनिटांत असं होणार कोरोनाचं निदान

संशोधकांचे म्हणणे आहे की विमानतळ, सीमा, स्टेडियम यासारख्या ठिकाणी ही चाचणी किट खूप उपयुक्त ठरेल.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जेरुसलेम, 29 मे : कोरोनाव्हायरस (Coronavirus) जेव्हा जगभरात मोठ्या वेगानं पसरत होता तेव्हा त्याच्या टेस्ट किटबाबत अनेक चर्चा होत्या. जगभरात कोरोना पसरवलेल्या चीननं स्वतःच कोरोना टेस्ट किट तयार करून इतर देशांना महागड्या दरानं विकल्या. यातील बर्‍याच किट सदोष असल्याचे आढळले आणि त्यांचे परिणाम अचूक असल्याचे आढळले नाही. भारतासह अनेक देशांनी या वाईट टेस्ट किट चीनला परत केल्या. कधी अँटीबॉडी टेस्ट किट, तर कधी आरटी-पीसीआर टेस्ट किटबद्दल प्रश्न उपस्थित होत. आता इस्त्राईलनं केवळ 3,800 रुपयांची कोरोना टेस्ट किट बनवण्याचा दावा केला आहे, ज्यामुध्ये केवळ 1 मिनिटांत कोरोनाचं निदान होते. त्याचे निकाल 90 टक्क्यांपर्यंत अचूक असल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे. फूंक मारून होणार व्हायरसचं निदान इस्राईलच्या बेन-गुरियन युनिव्हर्सिटीच्या (Ben-Gurion University) संशोधकांनी बनवलेल्या इलेक्ट्रो-ऑप्टिकल कोरोना टेस्ट किट नाक, घसा आणि फूंक मारून नमुने घेत आहेत. हे किट एम्म्प्टोमॅटिक कोरोना पॉझिटिव्ह लोकांमध्ये संक्रमणाची अचूक चाचणी देखील करू शकते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार किटमध्ये असलेले एक खास प्रकारचा सेन्सर कोरोनाचे निदान करते. जेव्हा रुग्ण चाचणी किटमध्ये फूंकतो तेव्हा ते कण सेन्सरपर्यंत पोहोचतात. हा सेन्सर क्लाऊड सिस्टमशी कनेक्ट केलेला आहे. सेन्सर सिस्टमचे विश्लेषण केल्यास रुग्ण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे कळतं. वाचा- देशाला लवकरच मिळणार कोरोनावर लस, पण शास्त्रज्ञांना सतावत आहे वेगळीच चिंता

वाचा- मुंबईची परिस्थिती गंभीर! शहरात फक्त 1 टक्का ICU बेड शिल्लक एअरपोर्ट, वॉर्डर, मैदान आणि सिनेमागृहात उपयोगी पडणार संशोधकांचे म्हणणे आहे की विमानतळ, सीमा, स्टेडियम यासारख्या ठिकाणी ही चाचणी किट खूप उपयुक्त ठरेल. या ठिकाणी, त्वरित निकाल देणारी कोरोना टेस्ट किट सर्वात यशस्वी होईल. इलेक्ट्रिक-ऑप्टिकल अभियांत्रिकीमधील बीजीयूच्या स्कूल ऑफ इलेक्ट्रिक आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग व विद्याशाखातील संशोधन प्रमुख गॅबी सरुसी यांन ही कल्पना मांडली. किट लोकांना लवकरात लवकर मिळावी यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) कडून मान्यता मिळवण्यासाठी त्यांची टीम तयारी करत आहे. वाचा- कोरोनाचे रिपोर्ट काढताना स्वतःच्या मुलाचं नाव आलं समोर, बापाचं भावनिक पत्र

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या