JOIN US
मराठी बातम्या / विदेश / इंग्लंडच्या महाराणीपेक्षा इन्फोसिसच्या नारायण मूर्तींच्या मुलींची संपत्ती जास्त, अर्थमंत्र्यांसोबत केलंय लग्न

इंग्लंडच्या महाराणीपेक्षा इन्फोसिसच्या नारायण मूर्तींच्या मुलींची संपत्ती जास्त, अर्थमंत्र्यांसोबत केलंय लग्न

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषि सुनक (Rishi Sunak) यांच्या पत्नी अक्षता मूर्ती ( Akshata Murty) या ब्रिटेनच्या महाराणीपेक्षाही जास्त श्रीमंत आहेत. हो तुम्ही वाचताय ते खरंय. पती-पत्नी दोघेही भारतीय वंशाचे आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 9 एप्रिल : तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषि सुनक (Rishi Sunak) यांच्या पत्नी अक्षता मूर्ती ( Akshata Murty) या ब्रिटेनच्या महाराणीपेक्षाही जास्त श्रीमंत आहेत. हो तुम्ही वाचताय ते खरंय. पती-पत्नी दोघेही भारतीय वंशाचे आहेत. अक्षता मूर्ती ही आयटी कंपनी इन्फोसिसचे फाऊंडर अब्जाधीश एनआर नारायण मूर्ती (NR Narayana Murthy) यांची मुलगी आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, 42 वर्षांच्या अक्षता मूर्ती यांच्याजवळ जवळपास एक बिलियन डॉलर म्हणजे, 7600 कोटी रुपयांइतके इन्फोसिस कंपनीचे शेअर आहेत. संडे टाईम्स रिच लिस्ट 2021 नुसार, अक्षता मूर्ती  यांची ही इतकी संपत्ती क्विन एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांनादेखील मागे टाकते. याचा अर्थ अक्षता मूर्ती ( Akshata Murty) या ब्रिटेनच्या महाराणीपेक्षाही जास्त श्रीमंत आहेत. क्विन एलिझाबेथ द्वितीय यांची वैयक्तिक संपत्ती ही जवळपास 460 मिलियन डॉलर म्हणजे 3400 कोटी रुपये इतके आहे. सुनक संकटात -  अक्षता आणि ऋषि सनक यांच्या जवळ चार संपत्ती आहेत. यात लंडनच्या अपस्केल केंसिंग्टन येथे 7 मिलियन डॉलर पाऊंडचे पाच बेडरुमचे घर आहे आणि कॅलिफोर्निया येथील सांता मोनिकामध्ये एक फ्लॅटचा समावेश आहे. अक्षता या व्हेंचर कॅपिटल कंपनी कॅटामारन व्हेंचरच्या संचालक पण आहे. या कंपनीची स्थापना त्यांनी सनक यांच्यासोबत 2013मध्ये केली होती. त्यांचे पती ऋषि सनक हे ब्रिटनमधील लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. मात्र, ते सध्या संकटात आहेत. यूकेमध्ये ग्राहकांच्या वाढत्या किमतींमुळे सुनकची लोकप्रियता कमी झाली आहे. याशिवाय मूर्तींच्या परकीय कमाईला ब्रिटीश कर अधिकाऱ्यांचे संरक्षण असल्याचाही आरोप सुनक यांच्यावर आहे. त्यामुळे सुनक यांच्यावक दबाव वाढला आहे. हेही वाचा -  ‘’…तर पाकिस्तान सोडून भारतात जा’’, इम्रान खान यांनी केलेल्या भारताच्या कौतुकावर पाकिस्तान नेता संतप्त

दरम्यान, अक्षता मूर्ती यांनी या आठवड्यात सांगितले आहे की, त्यांच्या इन्फोसिसच्या भागभांडवलातून मिळणारा परतावा फक्त यूकेच्या बाहेर कर आकारणीसाठी जबाबदार आहे. अक्षताने 2010 मध्ये स्वत:चे फॅशन लेबल अक्षता डिझाइन्स सुरू केले. 2011 च्या व्होग प्रोफाइलनुसार, ती  Indian-meets-Western fusion कपडे तयार करण्यासाठी दुर्गम खेड्यांमध्ये आर्टिस्ट्ससोबत काम करते.

अक्षता यांचे वडील नारायण मूर्ती यांनी 1981मध्ये प्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिसची स्थापना केली होती. आपल्या पत्नीपासून 10 हजार रुपये उधार घेऊन त्यांनी ही कंपनी सुरू केली होती. ती इन्फोसिस कंपनी आज 100 अरब डॉलरची आहे. अमेरिकन वॉल स्ट्रीटवर सूचीबद्ध होणारी ही पहिली भारतीय कंपनी होती. 2009मध्ये झाले दोघांचे लग्न - अक्षता आणि ऋषि एबीएच्या शिक्षणादरम्यान, अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात भेटले. ऋषि जवल आधीपासूनच ऑक्सफोर्डची प्रथम श्रेणीची डिग्री होती. 2009मध्ये दोघांनी लग्न केले. त्यांच्या रिसेप्शनमध्ये राजकारणी, उद्योगपती, क्रिकेटर्स यांच्यासह जवळपास 1000 लोकांनी सहभाग घेतला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या