JOIN US
मराठी बातम्या / विदेश / समुद्रात बुडतंय ऐतिहासिक जकार्ता, इंडोनेशियानं शोधली दुसरी राजधानी

समुद्रात बुडतंय ऐतिहासिक जकार्ता, इंडोनेशियानं शोधली दुसरी राजधानी

समुद्राचं अतिक्रमण आणि वाढतं प्रदूषण यामुळे इंडोनेशियानं आपली राजधानी बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जकार्ता, 20 जानेवारी: इंडोनेशियाची राजधानी (Indonesia Capital) जकार्ता (Jakarta) पुढील काही वर्षात पूर्णतः समुद्रात बुडण्याची (Sinking in sea) चिन्हं स्पष्ट दिसू लागल्यामुळे इंडोनेशियानं आपली राजधानी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नुसंतारा (Nusantara) हे शहर यापुढे इंडोनेशियाची राजधानी असणार आहे. एकीकडे ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Global Warming) समुद्राचा आकार वाढत चालला असून राजधानी जकार्ताला समुद्र आपल्या कवेत घेत चालला आहे. तर दुसरीकडे जकार्तामधील प्रदूषणातही कमालीची वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर इंडोनेशिया सरकारने नुकतान राजधानी बदलण्याच्या कायद्याला मान्यता दिली आहे.   कोट्यवधी डॉलर होणार खर्च नुुसंताराला जागतिक दर्जाचं शहर बनवण्याचा निर्णय़ इंडोनेशिया सरकारनं घेतला आहे. त्यासाठी 32 अब्ज डॉलर एवढा खर्च अपेक्षित असल्याचा अंदाज सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे. इंडोनेशियाचे पंतप्रधान सुहार्सो मोनॉर्फा यांनी केलेल्या दाव्यानुसार नुसंतारा ही इंडोनेशियाची खरी ओळख ठरेल, अशा दर्जाचं शहर बनवलं जाणार आहे. ते आर्थिक विकासाचं केंद्रही असणार आहे. सध्याची राजधानी जकार्ता हे प्रचंड लोकसंख्या असल्यामुळे गर्दीचं शहर बनलं आहे. त्यामुळे तिथल्या पायाभूत सुविधांवर ताण येत असल्याचं दिसत आहे.   हे वाचा-  ‘लुकाछुपी-2’च्या शूटिंगवेळी गोंधळ ; रुग्णांच्या नातेवाईकांसोबत बाऊन्सर्सनी.. ‘नुसंतारा’चा इतिहास इंडोनेशिया हा जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असणारा देश आहे. मात्र नुसंतारा आणि हिंदू संस्कृतीचा घनिष्ट संबंध असल्याचं सांगितलं जातं. नुसंतारा याचा अर्थ होतो द्विपांचा समूह. चौदाव्या शतकात या साम्राज्यात राजे होते हयम वुरुक. एका रिपोर्टनुसार, जोपर्यंत हा संपूर्ण प्रदेश म्हणजेच या भागातील सर्व बेटं आपल्या छत्राखाली येत नाहीत, तोपर्यंत मांसाहार न करण्याची शपथ त्यांनी घेतली होती. काही वर्षातच आपलं हे उद्दिष्ट त्यांनी पूर्ण केलं होतं. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या