जकार्ता, 14 डिसेंबर: इंडोनेशियामध्ये (Indonesia)पुन्हा एकदा त्सुनामीचा (Tsunami) इशारा देण्यात आला आहे. इंडोनेशियामध्ये पूर्व नुसा टेंगारा भागात 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप (Earthquake) झाल्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना हवामान खात्याने त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच वेळी, युरोपियन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्रानं मूल्यांकन केलं आहे की, हा भूकंप 7.7 रिश्टर स्केलचा होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. त्याचवेळी, यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने नंतर माहिती दिली आहे की, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.3 इतकी आहे. लोरेस बेटातील मौमेरे टाउनमधील एका व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार, भूकंपानंतर लोक भीतीनं घराबाहेर पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू फ्लोरेस बेटाच्या पूर्वेकडील लारंटुकाच्या वायव्येला 112 किमी अंतरावर 12 किमी खोलीवर होता. त्याचे आगमन झाल्यापासून, मलुका, पूर्व नुसा टेंगारा, पश्चिम नुसा टेंगारा, आग्नेय आणि दक्षिण सुलावेसीसाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. हेही वाचा- ग्राहकांच्या खिशाला चाप..! गोकुळची दूध दरवाढ, असे असतील नवे दर समोर आलेल्या माहितीनुसार, लारंटुकामध्ये पहिल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर आफ्टर शॉकही जाणवलं. हा भूकंप 5.6 रिश्टर स्केलचा होता. या भूकंपानंतर कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्याचं वृत्त नाही.