JOIN US
मराठी बातम्या / विदेश / दफनभूमीत मृतानं केलं बाय बाय; Video पाहून तुम्हालाही फुटेल घाम

दफनभूमीत मृतानं केलं बाय बाय; Video पाहून तुम्हालाही फुटेल घाम

इंडोनेशियात (Indonesia) एका मृतदेहाचा (dead body) दफनविधी सुरू असताना चक्क त्या मृतानं हात हलवलेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जकार्ता, 15 मे : एखादा मृत व्यक्ती हालचाल करू लागला तर तुमची काय हालत होईल. तशीच अवस्था इंडोनेशियातील (Indonesia) दफनभूमीत या लोकांची झाली. दफनविधी सुरू असताना मृतदेहानं हात हलवून (dead bodya hand waving) सर्वांना शेवटचा गूड बाय केलं आणि ते पाहिल्यानंतर सर्वांच्याच तोंडचं पाणी पळालं. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल. द सनच्या रिपोर्टनुसार मृतदेहाला जेव्हा कबरीत ठेवण्यात आलं, तेव्हा तो हात हलवू लागला. त्यावेळी कुणाचं लक्ष नव्हतं मात्र अंत्यसंस्काराचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या

धर्मगुरू जेव्हा शेवटची प्रार्थना बोलत असतात तेव्हाच या मृतदेहाचा हात हलतो. विशेष म्हणजे, ईश्वरने जॉनच्या आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की, मी पुनर्उत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो जिवंत राहतो. मृत्यूनंतरही, धर्मगुरूंच्या या वाक्यानंतरच मृत व्यक्तीचा हात हलू लागतो. लोकं हा व्हिडिओ पाहून खूप घाबरले. कित्येकांना वाटलं की जिवंत व्यक्तीला तर आपण दफन केलं नाही ना? हे वाचा -  अरेच्चा! कोंबड्यांनी चक्क दिली हिरवी अंडी; तुम्ही कधी पाहिलीत का? तज्ज्ञांनी सांगितलं की, मृतदेह आखडल्याने असं होऊ शकतं. कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर 72 तासांत मृतदेह आखडू लागतो.  शकतो. मांसपेशी खेचल्या जातात आणि त्यामुळेच त्यामुळेच हात वर झाला असावा आणि सर्वांना वाटलं की तो हात हलवत आहे. याआधी देखील अशी बरीच प्रकरणं पाहायला मिळालीत. 2011 मध्ये रशियामध्ये एका महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. जेव्हा तिचा मृतदेह दफन केला जात होता, तेव्हा अचानक ती ओरडली. त्यानंतर या महिलेला पुन्हा रुग्णालयात आणण्यात आलं आणि वेंटिलेटरवर ठेवलं. मात्र ती फक्त 12 मिनिटंच जिवंत राहू शकली, त्यानंतर तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी पहिल्यावेळी तिच्या मृत्यूबाबत चुकीची माहिती दिली होती, खरंतर ती जिवंत होती. हे वाचा -  लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर आराम करत होता बिबट्या, नागरिकांची पळापळ 2018 मध्येही अशाच पद्धतीनं आफ्रिकन महिलेचा मृत्यू झाला असं समजून तिला मॉर्चरीमध्ये टाकण्यात आलं. कार अपघातात ती जखमी झाली होती, मात्र डॉक्टरांनी ती मृत झाल्याची समजून तिला शवगृहात ठेवण्यात आलं. तिथल्या कर्मचाऱ्याला संशय आल्यानं त्यानं तिची तपासणी केली, तर त्या महिलेचा श्वास सुरू होता. नंतर या महिलेला वाचवण्यात आलं. संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या