भारतातून अफगाणिस्तानमार्गे (India and Afghanistan) लंडनसाठी (London) सुटणारी ही बस होती. कोलकात्यातून (Kolkata) निघून काबुल, तेहरान आणि इस्तंबूलमार्गे ही बस लंडनला पोहचायची.
या बसला भारतातून अफगाणिस्तानात पोहचण्यासाठी एक आठवडा लागत होता. या बसमध्ये प्रवास करण्यासाठी ईराण आणि अफगाणिस्तानचे नागरिक वाट बघायचे.
हा त्या बसच्या तिकीटाचा फोटो आहे. बसची मार्गाक्रमण करण्याची वेळ ठरलेली असायची. तो मार्ग अनेक देशांमधून जात होता.
बसमधून अनेक देशांतील प्रवासी प्रवास करायचे, या प्रवासाची सुरूवात ही भारतातातील कोलकात्यातून होऊन नंतर दिल्ली, काबुल,तेहरान आणि इस्तांबुलमार्गे ही बस लंडनला पोहचायची.
1972 मध्ये कोलकाता ते लंडन असा प्रवासाच्या भाड्याचा दर हा 145 पाउंड होता. पण त्यानंतर या दरात वाढ झाली. भाड्याच्या या दरामध्ये प्रवासातील सर्व सुखसोयींचा समावेश होता.
बसमध्ये खिडकीतून बाहेरील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी खास सुविधा होती. ज्याचा मनमुराद आनंद प्रवासी घ्यायचे.
हे त्या बसचे काही वर्षांपूर्वीचे तिकीट आहे. त्यावर स्पष्ट लिहीलेले होते की जर भारत आणि पाकिस्तानची सीमा बंद झाली तर तेवढा प्रवास हा हवाईमार्गाने होईल.