वुहान, 22 एप्रिल : जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाला (Coronavirus) नियंत्रणात आणले असल्याचे वाटत असतानाच नवीन नवीन बाबी समोर येत आहेत. चीनमधील (China) वुहानमधून (Wuhan) पसरलेल्या कोरोना (Covid -19) व्हायरसमुळे जगातील लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन केलं आहे. मात्र कोरोनाची लागण झाल्यानंतरही पुन्हा बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये व्हायरसची लक्षण दिसत असल्याचे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. वुहानमधील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये पुन्हा कोरोनाची लक्षणं दिसून येत आहे. अशा रुग्णांना वुहानमधील एका इंडस्ट्रियल प्लान्टजवळ तयार केलेल्या क्वारंटाइन हबमध्ये ठेवण्यात आले आहे. यानंतर या नागरिकांचे दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. उपचारादरम्यान चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जात आहे. मात्र यापैकी एका रुग्णाला पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आला होता. तेव्हा त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. मात्र या रुग्णाला कोरोना संसर्ग होऊन 2 महिने झाले आहेत. बरा झालेला रुग्णही पुन्हा कोरोनाबाधित होऊ शकतो या गोष्टीमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशाच स्वरुपाची अनेक प्रकरणं चीनमध्ये समोर आली आहेत. ज्यामध्ये बरा झालेला रुग्ण 50 ते 60 दिवसांनंतर पुन्हा पॉझिटिव्ह होतो. चीनने कोरोनावर नियंत्रण आणण्यात यश मिळवले असले तरी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत असल्याने अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. संबंधित - कोरोनाच्या लढ्यात यश! एकाच कुटुंबातील 6 जणं बरे होऊन परतले घरी, पुन्हा शतकपूर्ती निशब्द! लॉकडाऊनमध्ये आसरा घेतलेल्या शाळेला रंग देत मजुरांनी मानले आभार