इस्लामाबाद, 3 नोव्हेंबर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांच्यावर रॅलीत गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. वजीराबाद येथील जफर अली खान चौकाजवळ हा गोळीबार झाल्याची माहिती पाकिस्तानी मीडियाने दिली आहे.
पाकिस्तानातून मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून ते यात जखमी झाले आहेत. ही घटना जफर अली खान चौकात घडली. या गोळीबारात इमरान खान यांच्या पायाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याशिवाय आणखी 15 जणं या गोळीबारात जखमी झाले आहेत. रॅलीत अचानक झालेल्या गोळीबारानंतर सर्वत्र खळबळ उडाली.
माजी पंतप्रधानांचे व्यवस्थापक रशीद आणि सिंधचे माजी राज्यपाल इम्रान इस्माईल जखमी झाले आहेत. इम्रान खान सुरक्षित आहेत. वृत्तानुसार, इम्रान खानच्या पायाला गोळी लागली असून ते जखमी झाले आहेत.