JOIN US
मराठी बातम्या / विदेश / अल्लाहचं गाणं होतं सुरू अन् इमरान खानवर 4 वेळा Firing; घटनास्थळाचा Live Video 

अल्लाहचं गाणं होतं सुरू अन् इमरान खानवर 4 वेळा Firing; घटनास्थळाचा Live Video 

त्यांच्यावर गोळीबार नेमका कसा झाला याचा एक लाइव्ह व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ थरकाप उडवणारा आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इस्लामाबाद, 3 नोव्हेंबर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर आज एका रॅलीदरम्यान गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी इमरान खान आझाद रॅलीमध्ये होते. एका कंटेनरवरून त्यांचा ताफा पुढे जात होता. त्याचदरम्यान असं काही घडलं आणि एकच कल्लोळ उडाला. या घटनेत 15 जणं जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान त्यांच्यावर गोळीबार नेमका कसा झाला याचा एक लाइव्ह व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ थरकाप उडवणारा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर इमरान खान यांच्या काफिल्याच्या प्रतीक्षेत होता. तो कंटेनरच्या खूप जवळ होता. कंटेनरजवळ येताच त्यांना इमरान खान आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर गोळीबार केला. कंटेनरवर उभ्या असलेल्यांच्या पायाला गोळी लागल्याची माहिती सांगितली जात आहे.

इमरान खानची पहिली प्रतिक्रिया… या गोळीबारानंतर एकच गोंधळ उडाला होता. अल्लाने मला दुसरं आयुष्य दिल्याची भावना इमरान खान यांनी व्यक्त केली. याच्याशी मी लढा देईन, असंही ते यावेळी म्हणाले. त्यांना माझी हत्या करायची आहे, मात्र अल्ला माझ्यासोबत आहे, त्यामुळे मला काहीही होऊ शकणार नाही. हजारोंची रॅली अन् इमरान खानना केलं टार्गेट; गोळीबाराचा थरकाप उडवणारा Video  

त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याशिवाय आणखी 15 जणं या गोळीबारात जखमी झाले आहेत. रॅलीत अचानक झालेल्या गोळीबारानंतर सर्वत्र खळबळ उडाली. माजी पंतप्रधानांचे व्यवस्थापक रशीद आणि सिंधचे माजी राज्यपाल इम्रान इस्माईल जखमी झाले आहेत. इम्रान खान सुरक्षित आहेत. वृत्तानुसार, इम्रान खानच्या पायाला गोळी लागली असून ते जखमी झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या