JOIN US
मराठी बातम्या / विदेश / इम्रान खान यांना कोर्टाचा दणका, पाकिस्तानात हिंसाचार; युद्धासारखी भयंकर स्थिती

इम्रान खान यांना कोर्टाचा दणका, पाकिस्तानात हिंसाचार; युद्धासारखी भयंकर स्थिती

का धगधगतोय पाकिस्तान, इम्रान खान यांना कोर्टानं दिला दणका! हिंसाचारात 2 नागरिकांनी गमावला जीव, अनेक जखमी

जाहिरात

imran khan

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली. त्यानंतर तिथलं वातावरण तापलं असून हिंसाचार सुरू झाला आहे. लोकांनी जाळपोळ केली. इम्रान खानच्या अटकेनंतर पीटीआय नेत्यांनी कार्यकर्ते आणि समर्थकांना निषेध म्हणून रस्त्यावर उतरले आहेत. त्यानंतर समर्थकांनी रस्त्यावर उतरून जोरदार प्रदर्शनं केली. पीटीआय समर्थकांनी विविध ठिकाणी गोंधळ, तोडफोड आणि जाळपोळ केली. आंदोलकांनी लाहोरमधील सैन्याच्या कमांडर्सच्या घरात आणि रावळपिंडी येथील सैन्याच्या मुख्यालयाच्या आवारात प्रवेश केला आणि कॉर्प्स कमांडरच्या घरी गोळीबार केला. इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात युद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. PTI ने पोलिसांवर गोळीबार केल्याचा आरोप लावला आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. Image परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तानात ठिकठिकाणी कलम 144 लागू करण्यात आलं आहे. जे या कलमाचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. देशात अराजकता आणि अस्थिरता वाढली आहे. सरकार आणि पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तान सरकारने अफवांवर आळा घालण्यासाठी देशातील वेगवेगळ्या भागात यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तात्पुरते बंद केलं आहे. पाकिस्तानी माध्यमांनी असा दावा केला आहे की सरकारी संस्थांना यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. इम्रान खानच्या अटकेनंतर, एनएबीकडे त्यांना सोपवण्यात आलं. ७ डॉक्टरांच्या टीमने त्यांची तपासणी आणि चौकशी केली असून आता बुधवारी (10 मे) न्यायालयात हजर केलं जाणार आहे. कोर्टाने ही अटक योग्य असल्याचा निर्णय दिल्याने इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या