JOIN US
मराठी बातम्या / विदेश / मास्क घालाल तर दंड, लशीचं तर नावही काढायचं नाही; कोरोना काळात इथं आहेत विचित्र नियम

मास्क घालाल तर दंड, लशीचं तर नावही काढायचं नाही; कोरोना काळात इथं आहेत विचित्र नियम

मास्क घातला नाही म्हणून नाही तर मास्क घातला म्हणून दंड, असं का?

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 31 मे: एकिकडे कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढतो आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क (Mask) वापरणं बंधनकारक आहे. फक्त घराबाहेरच नाही तर घरातही मास्क घालण्याचा सल्ला दिला जातो आहे. मास्क घातला नाही म्हणून दंड आकारला जातो आहे. पण असं असताना अमेरिकेत मात्र एका ठिकाणी मास्क घातला नाही म्हणून नाही तर मास्क घातला म्हणून दंड ठोठावला (Fine for wearing mask) जातो आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया शहरातील फिडलहेड्स कॅफेतील हा विचित्र नियम. या नियमांमुळे सध्या हे कॅफे चर्चेत आहे. या कॅफेचे मालक क्रिस कासलमॅन यांनी नेहमीच कोरोनाच्या गाइडलाइन्स आणि कोरोना लशीचाही विरोध केला आहे. लॉकडाऊनमुळे अमेरिकेला खूप नुकसान झालं, असं ते मानतात. हे वाचा - फक्त 45+ लोकांनाच मोफत कोरोना लस का?; सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला झापलं कॅलिफोर्निया आणि हवाई ही अमेरिकेतील दोन अशी राज्ये आहेत, जिथं लस घेतल्यानंतरही लोकांना इंडोर्सही मास्क लावावे लागत आहेत. पण क्रिस यांनी मात्र आपल्या रेस्टॉरंटमध्ये मास्क लावण्यास नकार दिला आहे. जर कोणी मास्क लावून त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये दिसलं तर त्याला 5 डॉलर्स म्हणजे जवळपास 360 रुपयांचा दंड ठोठावला जाईल. तसंच जर कुणी कोरोना लशीचं कौतुक करताना दिसलं तर त्यालाही तितकाच दंड ठोठावला जाईल. आज तकच्या वृत्तानुसार याबाबत फॉक्स न्यूजशी बोलताना क्रिसने सांगितलं, की हा दंड स्थानिक समाजसेवेसाठी दिला जाईल. जेव्हा असा बोर्ड आपल्या रेस्टॉरंटबाहेर लावला तेव्हा बहुतेक लोक तिथूनच परतून गेले. तर जेव्हा काही जणांना दंडाचा हा पैसे समाजसेवेसाठी वापरला जाणार आहे, असं समजलं तेव्हा ते आनंदाने रेस्टॉरंटमध्ये आले. हे वाचा -  पुण्याचं Mission Vaccination, पहिल्या ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्राचं उद्घाटन आणखी काही महिने हा नियम कायम ठेवणार असल्याचंही क्रिस यांनी सांगितलं. मात्र तुम्ही आपल्या चेहऱ्यावरील मास्क हटवू नका. कोरोनाविरोधात तुमच्याजवळ सर्वात मोठं असलेलं शस्त्र म्हणजे हा मास्क आहे. त्यामुळे मास्कचा वापर जरूर करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या