JOIN US
मराठी बातम्या / विदेश / कोरोना व्हायरस संपला तरी जगावरचं दुसरं संकट कायम आहे, शास्त्रज्ञांनी दिला इशारा

कोरोना व्हायरस संपला तरी जगावरचं दुसरं संकट कायम आहे, शास्त्रज्ञांनी दिला इशारा

त्यात हजारो लोकांचे बळी जाऊ शकतात. तर आर्थिक हानी किती होईल याचा काहीच अंदाज नाही असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन 23 ऑगस्ट : कोरोनाच्या थैमानामुळे सर्व जग भयग्रस्त झालं आहे. जगातल्या 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचं संकट असून लाखो लोकांचा बळी त्याने घेतला आहे. तर अनेक देशांची अर्थव्यवस्था पार मोडकळीला आली आहे. जगाचा सर्व व्यवहारच त्याने बदलून गेला आहे. कोरोना व्हायरसवर औषध शोधण्याचं काम सुरु असून त्याला काही महिन्यांंमध्ये यश येण्याची शक्यता आहे. हा व्हायरस दोन वर्षांमध्ये नष्ट होईल असं WHOने म्हटलं आहे. मात्र  जगातल्या पर्यावरण शास्त्रज्ञांनी आणखी मोठा इशारा दिला असून कोरोनापेक्षाही वातावरणात होणार बदल हे जगावरचंं मोठं संकट आहे, त्याचबरोबर ते जास्त घातक असल्याचं म्हटलं आहे. कोरोना आज ना उद्या जाणार आहे. त्यापासून झालेलं नुसान कालांतराने भरून येईल. मात्र वातावणातल्या बदलामुळे जे अनिष्ट परिणाम होत आहेत ते सगळ्या पृथ्विसाठीच घातक आहेत. मानवाच्या अस्तित्वालाच त्यामुळे धोका असल्याचा इशारा जगभरातल्या अभ्यासक आणि तज्ज्ञांनी दिला आहे. पुढच्या तीन दशकांमध्ये पृथ्विच्या तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे जे परिणाम होतील त्यामुळे प्रचंड हानी होण्याची शक्यता आहे. अनेक छोेटे देश समुद्रात गडप होतील, तर वातावरणाचं चक्रही बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज राहवं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. हे वाचा -  कोरोनाची लस आल्यावर सर्वात आधी कुणाला मिळणार? WHOने दिलं उत्तर! त्यात हजारो लोकांचे बळी जाऊ शकतात. तर आर्थिक हानी किती होईल याचा काहीच अंदाज नाही असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. प्रदुषण, वाहनांचा वापर, निसर्गाची प्रचंड हानी यामुळे सगळ्या पृथ्विलाच धोका निर्माण झाला आहे. कोरोनाचं संकट गेल्यावर याचा विचार केव्हा होणार असा सवालही त्यांनी केला. सर्व जगाला यावर विचार करून आपली जीवनशैली बदलण्याची गरज असून असं झालं नाही तर मोठं संट आलं म्हणून समजा असा इशाराही दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या