JOIN US
मराठी बातम्या / विदेश / दहशतवाद्यानं बंदुकीनं उडवलं गायकाचं डोकं; तालिबानचा क्रूर चेहरा पुन्हा समोर

दहशतवाद्यानं बंदुकीनं उडवलं गायकाचं डोकं; तालिबानचा क्रूर चेहरा पुन्हा समोर

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात तालिबानचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. तालिबानच्या एका दहशतवाद्यानं बागलाण प्रांतातील अंदाराबी खोऱ्यात एका गायकाची निर्घृण हत्या (Folk singer murder) केली आहे.

जाहिरात

अफगाणिस्तानमधील विजयाबद्दल तालिबानला शुभेच्छा देताना अल कायदानं काश्मीरबाबत मोठं विधान केलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

काबूल, 30 ऑगस्ट: तालिबान संघटनेनं अफगाणिस्तानवर ताबा (Taliban Control Afghanistan) मिळवल्यापासून देशात सर्वत्र अराजक पसरलं आहे. यानंतर आता तालिबाननं आपल्या जुलमी कायद्यांची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील महिलांसोबत पुरुषही दहशतीच्या छायेत जगत आहेत. अशात तालिबानचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. तालिबानच्या एका दहशतवाद्यानं बागलाण प्रांतातील अंदाराबी खोऱ्यात एका गायकाची निर्घृण हत्या (Folk singer murder) केली आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहराच्या उत्तरेकडं सुमारे 100 किमी अतंरावर बागलाण प्रांत आहे. शुक्रवारी बागलाण प्रांतातील अंदाराबी खोऱ्यात लोकगित गायक फवाद अंदाराबी यांची निर्घृण हत्या केली आहे. तालिबानी दहशतवाद्यानं फवाद यांच्या डोक्यात गोळी घालून (Folk singer Fawad Andarabi shot dead) त्यांची हत्या केली आहे. त्यांच्या हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. हेही वाचा- Afghanistan Crisis: अमेरिकेनं ISISवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 3 चिमुकल्यांचा बळी ‘फवाद निष्पाप असून ते केवळ लोकांचं मनोरंजन करणारे एक गायक होते’, असं फवाद यांच्या मुलानं सांगितलं आहे. माझे वडील शेतात असताना, तालिबानी दहशतवाद्यांनी माझ्या वडिलांच्या डोक्यात गोळी घालून त्यांची हत्या केल्याचं, फवाद यांच्या मुलानं सांगितलं आहे. तसेच त्यानं तालिबानच्या एका स्थानिक समितीकडे आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. समितीनंही फवाद यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याला शिक्षा करण्याचं आश्वासन दिलं आहे, असंही त्यानं सांगितलं आहे. हेही वाचा- आणखी एका हवाई हल्ल्यानं उडवली काबुलची झोप, पहाटेच विमानतळावर तोफांचा मारा याबाबत माहिती देताना तालिबान संघटनेचे प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद यांनी एपी वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. ‘संबंधित घटनेबाबत पुरेशी माहिती आमच्याकडे सध्या उपलब्ध नाही. पण फवाद यांच्या हत्येची कसून चौकशी केली जाईल. तसेच दोषी आढळणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. फवाद यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या