JOIN US
मराठी बातम्या / विदेश / 250 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच! 85 मिनिटांसाठी अमेरिकेची सत्ता महिला उपराष्ट्राध्यक्षाच्या हाती

250 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच! 85 मिनिटांसाठी अमेरिकेची सत्ता महिला उपराष्ट्राध्यक्षाच्या हाती

अमेरिकेच्या 250 वर्षांच्या इतिहासात देशाची सत्ता एका महिलेच्या हाती देण्याची ही पहिलीच वेळ होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

न्यूयॉर्क, 20 नोव्हेंबर: शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden)यांच्या कोलोनोस्कोपीदरम्यान, अमेरिकेची सत्ता काही वेळेसाठी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस (Vice president Kamala Harris) यांच्याकडे हाती सोपवण्यात आली. कारण यावेळेत बायडेन यांना एनेस्थीसिया देण्यात आला होता. अमेरिकेच्या 250 वर्षांच्या इतिहासात देशाची सत्ता एका महिलेच्या हाती देण्याची ही पहिलीच वेळ होती. डॉक्टरांच्या मते, राष्ट्राध्यक्ष बायडेन पूर्णपणे निरोगी आणि त्यांच्या कामासाठी फिट आहेत. मात्र, त्याच्या वाढत्या वयाबद्दल डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. हेही वाचा-  एका सुंदर Love Story चा वाईट The End,संपूर्ण कुटुंबाचा अंत   अमेरिकेची सत्ता 85 मिनिटं होती हॅरिस यांच्या हातात व्हाईट हाऊसनं सांगितलं की, बायडेन यांनी यूएस वेळेनुसार सकाळी 10.10 वाजता सत्ता हस्तांतरित केली आणि 11.35 वाजता सत्ता ताब्यात घेतली. राष्ट्राध्यक्षांची कोलोनोस्कोपी वॉशिंग्टनच्या बाहेरील वॉल्टर रीड मिलिटरी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. हेही वाचा-  देशाची राजधानी अजूनही  Air Pollution च्या विळख्यात, आजही वाईट हवा व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी सांगितले की कोलोनोस्कोपीनंतर अध्यक्ष हॅरिस आणि व्हाईट ऑफिसचे प्रमुख रॉन क्लेन यांच्याशी बोलले आणि ते चांगले मूडमध्ये होते. बायडेन रुग्णालयात असताना उपराष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या वेस्ट विंग कार्यालयातून काम केलं. अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्षपद भूषवणारे बायडेन हे सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत. बायडन आज त्यांचा 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत. CNN च्या रिपोर्टनुसार, ते त्यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी शुक्रवारी सकाळी वॉशिंग्टनच्या बाहेरील वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमध्ये गेले होते. इथेच त्यांच्यावर दरवर्षी उपचार होतात. मात्र यावर्षी जानेवारीत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांची ही पहिलीच ट्रिटमेंट आहे. कोलोनोस्कोपी तपासणी दरम्यान त्यांना बेशुद्ध केलं जातं. यावेळी हॅरिस यांना अध्यक्षीय अधिकार देण्यात आले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या