नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाला आहे. त्या गोळीबारात खुद्द इम्रान खानही जखमी झाले आहेत. त्यांच्याशिवाय आणखी चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटकही केली आहे. त्याचबरोबर इम्रान खान यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान सध्या पाकिस्तानमध्ये आझादी रॅली काढत आहेत. ते सध्याच्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. तोशखाना प्रकरणात इम्रान दोषी आढळल्यापासून त्यांच्या वतीने आझादी रॅली सुरू करण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून गुरुवारी ही आझादी रॅली काढण्यात आली. मात्र. या रॅली दरम्यान गोळीबार झाला असून त्यात इम्रान खान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबारात त्यांच्याशिवाय माजी गव्हर्नर इम्रान इस्माईल हेही जखमी झाले आहेत. एके 47मधून हा गोळीबार झाला असून त्यात रायफलधारी हल्लेखोराचा चेहरा समोर आला आहे. तसेच या संबंधिचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला गोळी लागल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या गोळीबारात त्यांच्याशिवाय पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे अनेक नेते जखमी झाले आहेत. इम्रान खान यांच्यावर एके 47 ने गोळीबार करण्यात आला आहे. त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. तसेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.