JOIN US
मराठी बातम्या / विदेश / अध्यक्षपद सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिसले ट्रम्प, नव्या पक्षाबाबत केली मोठी घोषणा

अध्यक्षपद सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिसले ट्रम्प, नव्या पक्षाबाबत केली मोठी घोषणा

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे व्हाईट हाऊस सोडल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 1 मार्च : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे व्हाईट हाऊस सोडल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित होते. फ्लोरिडामधील एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यावर जोरदार टीका केली. ट्रम्प यांच्या काळातील अमेरिका फर्स्ट हे धोरण आता अमेरिका लास्ट झाल्याचा टोलाही ट्रम्प यांनी लगावला. नव्या पक्षाबाबत मोठी घोषणा अमेरिकेत आता 2024 ला अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीपूर्वी ट्रम्प नवा पक्ष स्थापन करतील अशी चर्चा होती. ट्रम्प यांनी ही चर्चा फेटाळली आहे. आपण पुढील निवडणूक रिपब्लिकन पक्षाकडूनच लढवणार असल्याचे संकेत त्यांनी दिली आहेत. ‘चार वर्षांपूर्वी एका वैभवशाली प्रवासाची आपण सुरुवात केली आहे. हा प्रवास अजून संपलेला नाही. खूप काही करणे बाकी आहे. आपण सर्व इथं आपला पक्ष, आपली चळवळ आणि आपल्या प्रिय देशाच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र आलो आहोत, असं ट्रम्प यांनी सांगितले. आपण कोणताही नवा पक्ष स्थापन करणार नाही. डेमॉक्रॅट्स निवडणूक हरले होते, असा दावा ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला. कदाचित मी त्यांना तिसऱ्यांदा हरवण्याचा निर्णय घेईन, असं सांगत ट्रम्प यांनी 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत उभे राहण्याचे संकेत दिले आहेत. अनेक बडे नेते सहभागी फ्लोरिडामध्ये झालेल्या या कार्यक्रमात माजी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो, टेस्सासचे सिनेटर टेड क्रुझ यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. (वाचा :  अमेरिकेने भारताकडूनही घेतलंय 15 लाख कोटींचं कर्ज  ) यापूर्वी कॅपिटॉल हिल (US Capitol Attack) मध्ये हिंसाचार आणि दंगल भडकवल्याच्या आरोपातून सिनेटनं ट्रम्प यांची मुक्तता केली होती. ट्रम्प यांची दुसऱ्यांदा महाभियोगाच्या (Impeachment) खटल्यातून मुक्तता झाली आहे. अमेरिकेच्या आजी किंवा माजी अध्यक्षांवर दुसऱ्यांदा महाभियोगाचा खटला चालवण्याची ही पहिलीच घटना होती. सिनेटच्या या निर्णयानंतर ट्रम्प यांचा तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या