JOIN US
मराठी बातम्या / विदेश / मास्क लावल्यानंतरही होतोय कोरोनाचा प्रसार, ही चूक पडतेय महागात; संशोधकांचा दावा

मास्क लावल्यानंतरही होतोय कोरोनाचा प्रसार, ही चूक पडतेय महागात; संशोधकांचा दावा

मास्क लावल्यानंतर कोरोना इन्फेक्शनचा धोका असतो, अशी माहिती नव्या संशोधनातून समोर आली आहे

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 17 जून : जगभरात कोरोनाव्हायरसची प्रकरणे वाढून 82 लाखांहून अधिक झाली आहे, तर 4 लाख 45 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. देशातील सर्व देशांना फेस मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग हे नियम बंधनकारक केले आहे. आता एक संशोधनातून धक्कादायक बाब समोर आली आहे. मास्क लावल्यानंतर कोरोना इन्फेक्शनचा धोका असतो. संशोधनानुसार जर तुम्ही संक्रमिक व्यक्तीपासून 3 फूटापेक्षा कमी अंतरावर आहात आणि मास्क घातला असेल तर तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता अधिक होते. ही बाब संशोधनातून उघड झाली आहे सायप्रसच्या निकोसिया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे की कोरोना विषाणू  मास्क घालून आणि 3 फूटाचं सोशल डिस्टन्सिंग करुनही शरीरात प्रवेश करू शकतो. संशोधकांनी म्हटले आहे की, कोरोना संक्रमित व्यक्तीला सतत खोकला असेल तर मास्क घालण्यात काही अर्थ नाही. मास्क घातले असूनही सुमारे 6 फूट अंतर आवश्यक आहे, असा इशारा विद्यापीठाच्या वैज्ञानिक तालिब बाक आणि दिमित्रीस डिकाकिस यांनी दिला आहे. 4 फूटापर्यंत दूर जातात खोकल्याचे कण दिमित्रीस डिकाकिस म्हणाले की, केवळ मास्कमुळे कोरोना विषाणूची लागण रोखता येऊ शकत नाही. ते म्हणाले की काही ड्रॉपलेट मास्क शील्डच्या आत जाऊ शकतात. इतकेच नाही तर पीडितेचे थेंब हवेत 4 फूटांपर्यंत जाण्यास सक्षम आहेत. संशोधनात असे दिसून आले आहे की, मास्क हवेतील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करतो, परंतु तो पूर्णपणे नष्ट करण्यास सक्षम नाही. फेस मास्क हा महामारीचा प्रसार धीमा करू शकतो मात्र मास्क किती सुरक्षित आहे याबाबत काहीही नेमकं सांगू शकत नसल्याचे सांगितले जात आहे. हे वाचा- क्वारंटाइन असलेल्या इंडियन ऑयलच्या अधिकाऱ्याचा घरात आढळला मृतदेह

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या