JOIN US
मराठी बातम्या / विदेश / जगातल्या दिग्गज Emirates Airlinesने 600 पायलट्सना दिला नारळ

जगातल्या दिग्गज Emirates Airlinesने 600 पायलट्सना दिला नारळ

नोकरी गेलेल्या या कर्मचाऱ्यांमध्ये अनेक भारतीयांचाही समावेश आहे.

जाहिरात

FILE - In this March 22, 2017, file photo, an Emirates plane taxis to a gate at Dubai International Airport in Dubai, United Arab Emirates. The Middle East's biggest airline, Emirates, said Thursday, May 9, 2019, that profits were down almost 70% in the past fiscal year reaching lows of $237 million compared to last year's $762 million. (AP Photo/Adam Schreck, File)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दुबई 9 जून: कोरोनाव्हायरस त्यानंतर आलेल्या लॉकडाऊनमुळे हवाई वाहतूक क्षेत्राचं कंबरडं मोडलं आहे. जगातल्या दिग्गज Emirates Airlinesने आपल्या ताफ्यातल्या तब्बल 600 पायलट्सना दिला नारळ देत नोकरूवरून काढून टाकलं आहे. त्यामुळे हवाई वाहतूक क्षेत्राला प्रचंड मोठा हादरा बसला आहे. सरकारी मालकीची असलेली ही कंपनी हवाई वाहतूक क्षेत्रातल्या जगातल्या बड्या कंपन्यांमध्ये गणली जाते. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक जवळपास बंदच असल्याने या कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. नोकरी गेलेल्या या कर्मचाऱ्यांमध्ये अनेक भारतीयांचाही समावेश आहे. Emirates Airlinesमध्ये 60 हजार कर्मचारी आहेत. काढण्यात आलेले पाटलट्स हे नवशिके पायलट्स आणि केबिन क्रु मेंबर्स आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलीय. या आधीही कंपनीने ही कर्मचाऱ्यांना काढून टाकलं होतं. त्यामुळे कामावरून काढलेल्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ही 792 एवढी झाली आहे. हावाई वाहतूकच बंद असल्याने प्रवाशांमध्ये मोठी घट झाली आहे. अगदी मोजक्याच फ्लाईट्स सुरू असल्याने कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे. जवळपास सगळ्याच कंपन्यांची ही अवस्था असल्याने हजारो तरुणांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पुढचे काही महिने अशीच स्थिती राहण्याची शक्यता असल्याने आणखी वाईट स्थिती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे वाचा - सगळ्यात चांगली बातमी! 2020मध्ये ‘या’ 8 संकटातून थोडक्यात वाचली पृथ्वी गाईंपासून तयार करणार कोरोनावर औषध, अमेरिकेतल्या कंपनीने केला दावा संपादन - अजय कौटिकवार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या