JOIN US
मराठी बातम्या / विदेश / कोरोनामुळे रखडली लसीकरण मोहीम; लस न मिळाल्याने तब्बल 8 कोटी मुलांचा जीव धोक्यात

कोरोनामुळे रखडली लसीकरण मोहीम; लस न मिळाल्याने तब्बल 8 कोटी मुलांचा जीव धोक्यात

जगातील 8 कोटी मुलांना लस मिळालेली नाही, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जिनिव्हा, 23 मे : कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी अद्याप लस उपलब्ध नाही. संपूर्ण जगाचं लक्ष त्याकडे लागलं आहे. मात्र सध्या ज्या आजारांवर लस (vaccine) उपलब्ध आहे आणि नियमित लसीकरणात (vaccination) ज्या लसींचा समावेश आहे, अशी लस लहान मुलांना दिली गेलेली नाही. त्यामुळे तब्बल 8 कोटी मुलांचा जीव धोक्यात आहे. एक वर्षाखालील मुलांना याचा सर्वात जास्त धोका आहे. जागतिक आरोग्य संघटने नं दिलेल्या माहितीनुसार, आठ कोटी मुलांना गोवर, पोलिओसारख्या आजारांविरोधातील लस मिळालेली नाही. 129 देशांमध्ये मार्च आणि एप्रिलमध्ये होणारं लसीकरण कोरोनाव्हायरसमुळे झालेलं नाही. प्रतिबंध करता येईल अशा आजारांची लस न मिळाल्यानं मुलांना या आजारांचा धोका आहे. असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. WHO चे डायरेक्टर जनरल टेंड्रॉस घेब्रेयेसूस म्हणाले, सार्वजनिक आरोग्याच्या इतिहासात लसीकरण हे आजारांपासून संरक्षण देणारं सर्वात मोठं शस्त्र आहे. कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीत लसीकरण कार्यक्रम कोलमडणं म्हणजे प्रतिबंध करता येईल अशा आजारांची पुन्हा दहशत निर्माण होणं" जगभरात 38 देशांतील 46 लसीकरण कार्यक्रम रद्द लसीकरण अभियानावर परिणाम होण्याची वेगवेगळी कारणं आहेत. काही पालक निर्बंधांमुळे घराबाहेर पडत नाहीत, काही जणांना लसीकरणाबाबत माहिती नाही, तर काही जण कोरोनाव्हायरसच्या भीतीनं मुलांच्या लसीकरणाला जात नाही. शिवाय बहुतेक प्रवासावरही बंदी असल्यानं, कोरोना ड्युटी किंवा आवश्यक सुरक्षात्मक उपकरणं नसल्यानं बहुतेक आरोग्य कर्मचारीही उपलब्ध नाहीत. युनिसेफनं जारी केलेल्या एका रिपोर्टनुसार 40 पेक्षा अधिक आफ्रिकी देशातील मुलांना लस दिली गेली नाही. कारण महाद्वीपावरील 54 देशांनी कोरोनामुळे आपली विमानतळं बंद केली. अधिकाऱ्यांनी सांगिल्यानुसार, जगभरातील 38 देशांमध्ये 46 लसीकरण कार्यक्रम रद्द करण्यात आले. यातील बहुतेक देश आफ्रिकेतील आहेत. हे वाचा -  जूनमध्ये होणार कोरोनाचा उद्रेक; टीबी तपासणीच्या मशीनने होणार कोरोना टेस्ट युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरिटा फोरे म्हणाल्या, एका आजाराशी लढ्याविरोधात आपण इतके वर्ष ज्या आजाराशी लढ्यात प्रगती केली आहे, ते विसरून चालणार नाही. आपल्याकडे गोवर, पोलिओ आणि कॉलरीविरोधात प्रभावी लस आहे. काही परिस्थितीमुळे आपल्याला हे लसीकरण थांबवावं लागलं. मात्र ते शक्य तितक्या लवकर सुरू करायला हवं. नाहीतर एका उद्रेकपासून वाचता वाचता आपल्याला दुसऱ्या उद्रेकाला सामोरं जावं लागू शकतं" कोरोनाव्हायरसच्या या परिस्थितीही लसीकरण मोहीम कसं राबवलं जाईल, याबाबत पुढील आठवड्यात गाइडलाइन्स जारी करणार असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या