JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / Covid Vaccine : कोरोना लस घेण्यास नकार दिल्यानं या प्रसिद्ध कंपनीने 1400 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Covid Vaccine : कोरोना लस घेण्यास नकार दिल्यानं या प्रसिद्ध कंपनीने 1400 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

आपल्या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांनी लस घ्यायला हवी. त्यासाठी सामूहिक पद्धतीनं लसीकरण करणाऱ्या अमेरिकेतील एका कंपनीत जेव्हा लस घ्यायला नकार दिल्यावर कंपनीनं चक्क 1400 कर्मचाऱ्यांची नोकरीवरून गच्छंती केली आहे. पाहा PHOTOS

0105

न्यूयॉर्कमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. असा आदेश गेल्या आठवड्यातच जारी करण्यात आला होता. त्यामुळं आता कंपनीतील सर्व लोकांना लस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

जाहिरात
0205

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लस हे एक प्रभावी शस्त्र असतानाही आपल्या कर्मचाऱ्यांनी लस घ्यायला नकार दिल्यावर अमेरिकेतील एका कंपनीने 1400 लोकांना कामावरून काढून टाकलं आहे.

जाहिरात
0305

हे प्रकरण न्यूयॉर्क राज्यातील सर्वात मोठी आरोग्य सेवा देणाऱ्या नॉर्थवेल हेल्थशी (Northwell Health) संबंधित आहे. हेल्थकेअरचे प्रवक्ते जो केम्प म्हणाले की ही लस प्रत्येकासाठी अनिवार्य करण्यात आली होती. जे कर्मचारी यासाठी तयार नव्हते त्यांना काढून टाकण्यात आलं आहे.

जाहिरात
0405

या कंपनीत सुमारे 76 हजार कर्मचारी काम करतात. त्यापैकी 1400 जणांना काढून टाकण्यात आले आहे. तर उरलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचं कोरोना लसीकरण करण्यात आलं आहे.

जाहिरात
0505

न्यूयॉर्कमध्ये सध्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. नॉर्थवेल हेल्थचे प्रवक्ते केम्प म्हणाले की आमचे ध्येय कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणे नव्हे तर सर्वांना कोरोनाची लस मिळवून देणं हे होतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या