JOIN US
मराठी बातम्या / विदेश / सावधान! निरोगी झालेल्या रुग्णांना पुन्हा होतोय कोरोना, डॉक्टरही झाले हैराण

सावधान! निरोगी झालेल्या रुग्णांना पुन्हा होतोय कोरोना, डॉक्टरही झाले हैराण

सध्या 91 लोकांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. येणाऱ्या काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोल, 11 एप्रिल : कोरोनाव्हायरसने साऱ्या जगाला हैराण केले आहे. अद्याप कोणत्याही देशाला यावर ठोस उपाय शोधता आलेले नाही. या सगळ्यात दक्षिण कोरियामधून आश्चर्यकारक ट्रेंड समोर येत आहे. दक्षिण कोरियात हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही रुग्णांमा पुन्हा कोरोना झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. अशी एकूण 91 प्रकरणे एकाच दिवशी समोर आली. हे कसे घडत आहे हे अद्याप डॉक्टरांनाही समजू शकलेले नाही. दक्षिण कोरियातील आतापर्यंत या देशातील सुमारे 7 हजार लोक कोरोनामुळे बरे झाले आहेत. निरोगी रुग्णांना का होत आहे पुन्हा कोरोना? दक्षिण कोरियातील प्रमुख डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सध्या 91 लोकांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. येणाऱ्या काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर काही तज्ज्ञांच्या मते, कदाचित असे झाले असेल की रुग्णाला संसर्ग झालेला नसेल परंतु त्याच्या शरीरात आधीच अस्तित्वात असलेला व्हायरस पुन्हा सक्रिय झाला असेल. इतकेच नाही काही डॉक्टरांनी चाचणी किटमध्ये एखादी समस्या उद्भवली असेल, अशी शक्यता वर्तवली आहे. तयारी असेल तरच लॉकडाऊन हटवा नाहीतर…, WHOने दिला इशारा 200 पेक्षा जास्त मृत्यू दक्षिण कोरियामध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 211 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत येथे कोरोनाची 10 हजारहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दक्षिण कोरियामध्ये झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला. त्यानंतर, त्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या 2.12 लाख लोकांची ओळख आणि त्यांची वैयक्तिक माहिती एकत्रित करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. यानंतर, प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. प्रभावी पावले उचलली गेली दक्षिण कोरियाच्या सरकारने संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी त्वरित सर्व चर्च बंद करण्यात आले आहे. याशिवाय देशातील सर्व निषेध व बौद्ध कार्यक्रम रद्द करण्यात आले. एवढेच नाही तर दक्षिण कोरियाने मास्कच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. हे खरं Social Distancing! शेजाऱ्यांसोबत सिनेमा पाहण्यासाठी वापरली भन्नाट आयडिया

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या