भारतात पुण्यासह काही शहरांमध्ये या चाचण्या सुरू असून सीरम इन्स्टिट्यूट या लशीचं उत्पादन करणार आहे.
लंडन, 11 एप्रिल : कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या आजारामुळे आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. दुसरीकडे या विषाणूला रोखण्यासाठी अद्याप ठोस लस सापडलेली नाही. शास्त्रज्ञ बर्याच काळापासून कोव्हिड-19च्या लसीवर काम करत आहेत. मात्र आता शास्त्रज्ञांनी आशेचा किरण दाखवला आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीकरणशास्त्र विभागाच्या प्रोफेसर सारा गिलबर्ट यांनी दावा केला आहे की, तिची टीम लवकरच कोरोना विषाणूची लस तयार करेल. सारा यांनी येत्या 15 दिवसांत कोरोना विषाणूची लस चाचणी करणार असल्याचे सांगितले. या लसीबाबत सारा यांना 80 टक्के विश्वास आहे. या चाचणीचा निकाल चांगला आल्यात सरकार यासाठी निश्चितपणे निधी जाहीर करेल, याचीही चिन्हे असल्याचा विश्वास सारा यांनी व्यक्त केला. याआधी अमेरिकेने मानवावर लसीची चाचणी केली होती. मात्र अद्याप या लसीबाबत अधिक माहिती मिळालेली नाही. त्यामुळे अमेरिकेआधी ब्रिटनमध्ये ही लस तयार केली जाऊ शकते. वाचा- बाथरूममध्ये रक्तबंबाळ अवस्थेत आढळला कोरोना रुग्ण, काही क्षणानंतर… दरम्यान, लसीचा यशस्वीरित्या शोध येईपर्यंत लोकांनी सामाजिक अंतर पाळावे आणि लॉकडाऊनचे पालन करण्याचा सल्ला सारा यांनी दिला आहे. प्रोफेसर सारा यांना ही लस यशस्वी होण्याची बरीच आशा आहे. अनेक प्रकारच्या सुरक्षा चाचण्या लवकरच सुरू केल्या जातील. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत जगाला कोरोनाव्हायरसची लस मिळण्याची शक्यता आहे. वाचा- आईच्या प्रेमाला तोडू नाही शकला कोरोना, नर्स लेकीला पाहताच आईने मारली घट्ट मिठी लॉकडाऊनमुळे कोरोनाचा फैलाव झाला कमी सारा यांच्या मते लॉकडाऊनमुळे चाचण्या घेण्यात अनेक अडचणी येत आहेत. मात्र लॉकडाऊनमुळेच कोरोना विषाणूचा फैलाव खूप कमी झाला आहे. युरोप आणि अमेरिकेत कोरोनाचा सर्वात जास्त प्रसार होत आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 70 हजारहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या आहे. या व्यतिरिक्त सुमारे 9,000 लोक मरण पावले आहेत. कोरोना विषाणूमुळे होणार्या मृत्यूची संख्या इटली, अमेरिका आणि स्पेन सर्वात जास्त आहे. वाचा- सावधान! निरोगी झालेल्या रुग्णांना पुन्हा होतोय कोरोना, डॉक्टरही झाले हैराण अमेरिकेत 24 तासात 2 हजार मृत्यू चीनच्या वुहानमधून कोरोना व्हायरसचं संक्रमण होण्यास सुरुवात झाली. चीन पाठोपाठ इटली, स्पेन, अमेरिका अशा अनेक मोठ्या देशांहस 181 देशांना कोरोनाचा विळखा आहे. या देशांमध्ये अक्षरश: कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येनं रेकॉर्ड ब्रेक केला आहे. एका दिवसात 2 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 24 तासांत एवढ्या मोठ्या संख्येनं रुग्णांचा मृत्यू जगात पहिल्यांदाच घडला आहे. अमेरिका असा पहिला देश आहे जिथे आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे 18 हजार 849 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतला आहे.