फ्लोरिडा, 04 एप्रिल : कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात 50 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका आता कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. दररोज हजारो नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. यातच अमेरिकेतल्या फ्लोरिडा शहरातील एका दाम्पत्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूमध्ये फक्त सहा मिनिटांचं अंतर होतं. सीएनएनने याबाबतचं वृत्त दिलं आहे. फ्लोरिडात राहणाऱ्या 74 वर्षीय स्टुअर्ट बेकर आणि त्यांची 72 वर्षांची पत्नी एड्रियान बेकर यांचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. दोघांच्या लग्नाला 51 वर्षे झाली होती. मार्चच्या मध्यापर्यंत दोघेही एकदम ठणठणीत होते. त्यानंतर पहिल्यांदा स्टुअर्टला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर पत्नीलाही कोरोना झाला. स्टुअर्टची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना आयसीयुमध्ये ठेवण्यात आलं होतं. तर पत्नीला घरीच आयसोलेट राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र त्यांनाही कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथं पती होता तिथंच पत्नी एड्रियान यांना ठेवण्यात आलं होतं.
शेवटच्या क्षणांमध्ये दोघेही व्हेंटिलेटरवर होते. दोघांचा मृत्यू एकाच दिवशी झाला. त्यांच्या मृत्यूमध्ये 6 मिनिटांचं अंतर होतं. याची माहिती त्यांचा मोठा मुलगा बडी बेकर यांनी ट्विटरवरून दिली आहे. त्याचा एक व्हिडओसुद्धा शेअर केला आहे. हे वाचा : लॉकडाउन 6 आठवडे केलं तरच कोरोनावर नियंत्रण शक्य, संशोधकांनी दिला ‘हा’ सल्ला चीनमधून जगभर पसरायला सुरुवात झालेल्या कोरोनामुळे इटली, स्पेन, अमेरिकेला मोठा दणका दिला आहे. इटली, स्पेनमध्ये मृतांचा आकडा 10 हजारांच्या वर आहे. तर अमेरिकेत दररोज हजारो लोकांना कोरोना झाल्याचं समोर येत आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 हजारांच्या वर पोहोचला असून 77 जणांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा : कोरोना लॉकडाऊनचा सगळ्यात मोठा फायदा, पृथ्वीचे व्हायब्रेशन झाले पूर्वीपेक्षा कमी