शहरात सध्या 703 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 437 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
मुंबई 20 एप्रिल: जगभर कोरोनाचं थैमान सुरूच आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण येत आहेत. मात्र गेल्या तीन दिवसांमध्ये त्यांची संख्या थोडी कमी झाली आहे. जगभर रविवारी 75,471 नवे रुग्ण सापडले त्यामुळे जगातल्या एकूण रुग्णांची संख्या 24,03,410 एवढी झाली आहे. तर रविवारी जगभर 5 हजार लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 1,65,216 एवढी झाली आहे. अमेरिकेतल्या कोरोना मृतांचा आकडा 40 हजार 683 एवढा झालाय. तर 7 लाख 59 हजार 786 एवढे लोक कोरोनाबाधित आहेत. 70 हजार 980 लोग बरे झाले आहेत. इटलीत आत्तापर्यंत 23 हजार 660 लोकांचा मृत्यू झालाय. तर 1 लाख 78 हजार 972 जण बाधित आहेत. स्पेनमध्ये 2 लाख 210 लोक बाधित आहेत. तर 20 हजार 852 लोकांचा मृत्यू झाला आहे. फ्रांसमध्ये 19 हजार 718 लोकांचा मृत्यू झालाय. तर 1 लाख 52 हजार 894 जण बाधित आहेत. ब्रिटेनमध्ये 16 हजार 60 जणांचा मृत्यू झालाय. तर 1 लाख 20 हजार 67 जण बाधित आहेत. जगभर हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जवळपास 1 लाख 60 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. चीनमधून याचा प्रादुर्भाव जगभर झाला. यामुळे अमेरिकेनं चीननेच कोरोना तयार केल्याचा दावाही केला आहे. ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत भारताच्या या कंपनीचा पुढाकार, अमेरिकेने मानले आभार दरम्यान, वुहानमधील लॅबने हे सर्व आरोप पहिल्यांदाच फेटाळून लावले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांनासुद्धा फेटाळलं आहे. ट्रम्प यांनी आरोप केला होता की, हा धोकादायक व्हायरस जगभर पसरण्यास चीनच्या लॅबमधूनच सुरूवात झाली होती. अमेरिकेसह अनेक देशांनी चीनवर कोरोनाबाबत आरोप केले आहेत.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की,‘कोरोना व्हायरस वुहानमधील एका लॅबमधून निघाला आणि जगभर पसरला.
’ गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात वुहानमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर असं म्हटलं जात होतं की, हा व्हायरस वुहानमधील WIV किंवा हुआननानच्या सीफूड मार्केटमधून पसरला आहे. WIV आणि त्यांची खास अशी पी4 लॅब अशा धोकादायक व्हायरसना जतन करण्यास सक्षम आहे. दरम्यान, याबाबत फेब्रुवारीत लॅबने कोरोनाबाबतच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या.