आपण अनेकदा पाहतो दारू प्यायलेला माणूस काहीही बरळायला लागतो. त्याला नीट उभंही राहता येत नाही.
बँकॉक 15 मार्च : पार्टी म्हटली की सर्वजण उत्साहाने एकत्र येतात. असाच पार्टीचा उत्साह 11 मित्रांना महागात पडला आहे. या अकरा जणांना कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे. थायलंडमधील (Thailand) ही घटना आहे. बँकॉक पोस्टने (Bangkok post) याबाबत वृत्त दिलं आहे. बँकॉक पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, ‘15 जणांनी एकत्र येत पार्टी केली. यापैकी कागी जण 21 फेब्रुवारीला हाँगकाँगमधील एका व्यक्तीच्या संपर्कात आले होते, जिथे कोरोनाव्हायरसचा प्रसार झाला’ हे वाचा - दुष्काळात तेरावा महिना; ‘कोरोना’सह आता बर्ड फ्लू, स्वाइन फ्लूचा कहर ‘त्यानंतर 25 फेब्रुवारीला या लोकांना ताप, डोकेदुखी आणि खोकला होता. प्रकृती ठिक नसतानाही हे सर्व जण 29 फेब्रुवारीला पार्टीमध्ये सहभागी झाले. तिथं त्यांनी दारू, सिगारेट शेअर केली. त्यापैकी 11 जणांचा कोरोनाव्हायरसचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर हे लोकं 4 मार्चला थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचले’
थायलंडमध्ये कोरोनाव्हायरसचे एकूण 114 रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. बँकॉक पोस्टने याबाबत ट्विट केलं आहे.
भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 107 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 31 रुग्ण आहेत. जगभरात या व्हायरसने 5,800 पेक्षा जास्त बळी घेतलेत. तर 1,56,000 लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. भारतात या व्हायरसला राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. शिवाय व्हायरसवर आळा घालण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदाही लागू करण्यात आला आहे. हे वाचा - ‘कोरोना’बाबत कुठलाही मेसेज फॉरवर्ड करताना सावधान! चुकीची माहिती पडेल महागात