JOIN US
मराठी बातम्या / विदेश / कोरोनाशी कसा लढणार पाकिस्तान? बेड नसल्याने जमिनीवरच सुरू आहेत रुग्णांवर उपचार

कोरोनाशी कसा लढणार पाकिस्तान? बेड नसल्याने जमिनीवरच सुरू आहेत रुग्णांवर उपचार

पाकिस्तानमध्ये 11 हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत तर, 237 लोकांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कराची, 24 एप्रिल : जगभरात थैमान घातल असलेल्या कोरोनाने पाकिस्तानमध्येही वेगानं शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानमध्ये 11 हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत तर, 237 लोकांचा मृत्यू झाला आहे.अशा परिस्थितीत चक्क कोरोनाबाधित रुग्णांना जमिनीवर झोपावे लागत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना त्याच्यांकडे आवश्यक सोयी सुविधाही नाही आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी बर्‍याच डॉक्टरांनी इम्रान सरकारला मदतीसाठी विनंती केली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिती नुसार गेल्या 24 तासांत 742 नवीन रुग्ण आढळून आले आलेत. पाकिस्तान मेडिकल असोसिएशनशी (PMI) संलग्न असलेल्या कराचीमधील आघाडीच्या डॉक्टरांनी सरकारला साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊनचे नियम आणखी कडक करण्याची मागणी केली. धार्मिक नेत्यांनीही या उपायांचे अनुसरण करण्याचे आवाहन करण्यात केले. डाऊ युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसचे डॉक्टर साद निआझ यांनी समोर असलेल्या कोरोना विषाणूशी लढा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या स्थितीचे वर्णन केले. ते म्हणाले की, ‘आर्थिक आणि सामाजिक अडचणींमुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आल आहे. 16 ते 21 एप्रिल दरम्यान सुमारे चार हजार रुग्ण वाढले’.पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघनही केले जात आहे. वाचा- कोरोनामुळं घरच्यांनी सोडली साथ! स्मशानाबाहेर एक तास मृतदेह राहिला पडून अखेर… लस निर्मितीसाठी पाक करणार मदत पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, चीनच्या अग्रगण्य औषधी कंपनीने कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचणीत सहकार्य करण्यासाठी पाकिस्तानच्या एका प्रमुख राष्ट्रीय आरोग्य संस्थेला आमंत्रित केले आहे. या अहवालानुसार, पाकिस्तानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ऑफ पाकिस्तानला चीन सायनोफेर्म आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेशनकडून पाकिस्तानमध्ये कोरोना लसीसाठी क्लिनिकल चाचणी प्रस्ताव दिला आहे. वाचा- ‘साहेब, भूक लागली आहे खायला द्या, 3 दिवसांपासून पोटात अन्नाचा घास नाही’ पाकला IMFकडून 1.39 अब्ज डॉलरची मदत कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) 1.39 अब्ज डॉलर्स कर्ज मिळाले आहे. कोरोना विषाणूच्या संकटामुळे झालेली आर्थिक मंदी लक्षात घेता, परकीय चलन साठा दुरुस्त करण्यासाठी हे कर्ज त्यांना देण्यात आले आहे. हे कर्ज 6 अब्ज डॉलर्सच्या राहत पॅकेज व्यतिरिक्त आहे. वाचा- आजारी 17 वर्षांच्या मुलीला खांद्यावर घेऊन बापानं 26 किमी चालत गाठलं रुग्णालय संकलन, संपादन-प्रियांका गावडे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या