JOIN US
मराठी बातम्या / विदेश / ‘आम्ही फक्त मरणाची वाट पाहतोय’, या देशात कोरोनाच्या ‘त्सुनामी’ची शक्यता

‘आम्ही फक्त मरणाची वाट पाहतोय’, या देशात कोरोनाच्या ‘त्सुनामी’ची शक्यता

या जेलमध्ये प्रमाणापेक्षा कितीतरी जास्त कैदी असून एक ऐका बराकीत कैद्यांना जनावरांसारखे कोंबण्यात आलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मनिला 04 मे: कोरोनाव्हायरमुळे सगळं जग त्रस्त आहे, जगातल्या 185 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. फिलिपिन्समध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आता फिलिपिन्सच्या जेलमध्येही कोरोना घुसला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. कोरोनाने वेग पकडला तर या देशात कोरोना त्सुनामी येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. याबाबतचं वृत्त अल जजिराने दिलं आहे. जगातल्या सर्वाधिक गर्दी असलेल्या जेल्समध्ये फिलिपिन्स पहिल्या क्रमांकावर आहे. काही जेलमध्ये कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. जेलमध्ये 300 पेक्षा जास्त कोव्हिड19 चे रुग्ण सापडल्याने सरकार हादरून गेलं आहे. याच जेलमध्ये 2 लाखांपेक्षा जास्त कैदी असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या जेलमध्ये प्रमाणापेक्षा कितीतरी जास्त कैदी असून एक ऐका बराकीत कैद्यांना जनावरांसारखे कोंबण्यात आलं आहे. ड्रग्ज विरोधातल्या अभियानात तिथे 2 लाखांपेक्षा जास्त जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. सोशल डिस्टंसिंगचा अभाव, अपुरी आरोग्य व्यवस्था यामुळे सरकारसमोर नवं संकट आलं आहे. काही ताब्यात असलेल्या कैद्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की इथे आम्ही फक्त मरणाची वाट पाहात आहोत. कोरोना इतर कैद्यांमध्येही पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. हेही वाचा - चीननं असा पसरवला जगभरात कोरोना, अमेरिकेला मिळाला सर्वात मोठा पुरावा …तर वर्षाअखेरीस मिळणार कोरोनाची लस, ट्रम्प यांचा सर्वात मोठा दावा 2 वर्षे तरी कोरोनाव्हायरसला रोखणं शक्य नाही, तज्ज्ञांचा दावा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या