सिडनीतील 2-जीबी रेडिओनुसार, ऑस्ट्रेलियाचे आरोग्य मंत्री ग्रेग हुंट (Greg Hunt) यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. हुंट यांनी, सांगितलं की, ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेका वॅक्सिन घेणं ऐच्छिक असेल, परंतु आम्ही अधिकाधिक लोकांना यासाठी प्रोत्साहित करू. ऑस्ट्रेलियन लोकसंख्येनुसार आमच्याकडे अधिक वॅक्सिन असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये सर्वसामान्यांना वॅक्सिन देण्यास सुरुवात केली जाईल. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)
नवी दिल्ली, 04 डिसेंबर : पुढच्या आठवड्यात ब्रिटनमध्ये नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर आता ब्रिटननं आणखीन एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाची लस नागरिकांना दिल्यानंतर जर कोणताही मोठा दुष्परिणाम आढळून आला तर त्या नागरिकांना ब्रिटन नुकसान भरपाई देणार आहे. कोरोना विषाणूच्या लसीच्या दुष्परिणामांमुळे पीडित लोकांना ब्रिटन नुकसान भरपाई करणार आहे. ब्रिटनच्या सरकारने फायझर आणि बायोनोटेकच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. ब्रिटन प्रथमच आपल्या नागरिकांना कोरोना लस देणार आहे.
हे वाचा- कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ, मृत्यूचा आकडा वाढला कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्या पार्श्वभूमीवर देशात कोरोनाची लस नागरिकांना देण्यात येणार आहे. कोरोनाची लस नागरिकांना देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश आहे. ही लस 95 टक्के प्रभावी असल्याचं सांगितलं आहे. भारतात मानवी चाचणीदरम्यान सीरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या लशीचे दुष्परिणाम झाल्याचा दावा एका 40 वर्षीय तरुणानं करत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. मात्र सीरमनं या संदर्भात परिपत्रक काढून या व्यक्तीनं केलेले दावे खोटे असल्याचं सांगत त्याच्यावर 100 कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करण्यात आला आहे. ब्रिटनमधील नागरिकांना ही लस देण्यात आल्यानंतर जर मोठे दुष्परिणाम आढळून आले तर त्याची नुकसान भरपाई ब्रिटन सरकारकडून केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.