JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / पुतिन यांची कमाल, गोठलेल्या थंडगार पाण्यात मारली डुबकी, काय आहे हा प्रकार?

पुतिन यांची कमाल, गोठलेल्या थंडगार पाण्यात मारली डुबकी, काय आहे हा प्रकार?

असं मानलं जातं की, कम्युनिस्ट नेता (Communist Leader) धार्मिक परंपरा आणि श्रद्धांना मान्यता देत नाही. पुतिन कम्युनिस्ट नेते (Vladimir Putin) असूनही या धार्मिक परंपरा साजरे करताना दिसले. जाणून घ्या लिटिल ख्रिसमस (Little Christmas) म्हटलं जाणाऱ्या या दिवसाला कसं आणि का सेलिब्रेट केलं जातं…

0106

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. परंतु आता ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. एक ईसाई परंपरा निभावण्यासाठी पुतिन यांनी मॉस्कोजवळ असलेल्या एका क्रॉस आकाराच्या पूलमध्ये डुबकी मारकी. रशियात टीव्हीवर अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ दाखवण्यात आले. पुतिन यांनी ज्या पाण्यात डुबकी मारली, त्या पाण्याचं तापमान -14 डिग्री सेल्सियस असल्याचं सांगण्यात आलं.

जाहिरात
0206

रशियातील टेलिव्हिजनवर दाखवण्यात आलं की, 68 वर्षीय पुतिन यांनी क्रॉस शेपच्या पूलमध्ये तीन वेळा डुबकी मारली, त्या पाण्यात बर्फही जमा झाल्याचं म्हटलं जात आहे. असं म्हटलं जातं की, ईसाई धर्माच्या ऑर्थोडॉक्स चर्चशी संबंधीत परंपरेमुळे असं करण्यात आलं किंवा पुतिन कम्युनिस्ट नेते असल्यानेही असं करणं चर्चेचा विषय ठरला होता. (Image : Pixabay)

जाहिरात
0306

ऑर्थोडॉक्स पंथ मानणारे ईसाई दरवर्षी एपिफेनी पर्व साजरा करतात, हा जॉर्डन नदीमध्ये ईसा मसीहच्या बप्तिस्मा संस्कारच्या आठवणीत साजरा केला जातो. याला लिटिल ख्रिसमस असंही मानलं जातं. या दिवशी ख्रिसमस पर्व संपल्याचंही मानलं जातं.

जाहिरात
0406

पूर्वेकडील देशांमध्ये ईसाई एपिफेनी जॉर्डन नदीत क्राईस्टच्या संस्कार दिवसाच्या आठवणीत हे पर्व साजरं केलं जातं, आणि त्यामुळेच पवित्र मानल्या जाणाऱ्या एखाद्या सरोवरात किंवा नदीत स्नान केलं जातं. (Image : Pixabay)

जाहिरात
0506

केवळ अंघोळचं नाही, तर अनेक परंपराही यादिवसाशी निगडित आहेत. यादिवशी लोक एपिफेनी गाणी गातात, थ्री किंग्स केक खातात, चर्चमध्ये जातात आणि ख्रिसमससाठी केलेली सजावटही या दिवशी काढली जाते.

जाहिरात
0606

असं मानलं जातं की, कम्युनिस्ट नेता धार्मिक परंपरा आणि श्रद्धांना मान्यता देत नाही. पुतिन कम्युनिस्ट नेते असूनही या धार्मिक परंपरा साजरे करताना दिसले. पुतिन कम्युनिस्ट असूनही ईसाई धर्म मानणारे आहेत. पुतिन यांनी अनेकदा आपल्या धार्मिक आणि राजनीतिक विचारांवर चर्चा केली आहे. स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि न्याय या गोष्टी विचारात आहेत असंही ते म्हणतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या