JOIN US
मराठी बातम्या / विदेश / धक्कादायक! कोरोनावर लस शोधण्याआधीच चिनी प्राध्यपकाची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

धक्कादायक! कोरोनावर लस शोधण्याआधीच चिनी प्राध्यपकाची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

हत्या करण्यात आलेले प्राध्यापक कोरोना विषाणूच्या सेल्युलर यंत्रणेचा शोध लावण्याच्या अगदी जवळ होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

न्यूयॉर्क, 07 मे : कोरोनामुळं संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वात जास्त बळी आहे. या सगळ्यात अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया प्रांतात कोरोना व्हायरसबाबत संशोधन करणाऱ्या चीनच्याय प्राध्यपकाची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. हे प्राध्यापक कोरोना विषाणूच्या सेल्युलर यंत्रणेचा शोध लावण्याच्या अगदी जवळ होते, जो या संसर्गावर उपचार करण्यास खूप उपयुक्त आहे. पेन्सिल्वेनियाची राजधानी असलेल्या पिट्सबर्गमधील रॉस शहरात 37 वर्षीय बिंग लियू यांना त्यांच्याच घरात घुसून गोळी मारण्यात आली. लियू हे पिट्सबर्गच्या विद्यापीठातील औषध विभागात काम करत होते. मीडिया रिपोर्टनुसार, लियू यांच्या घरा शेजारीच असलेल्या एका गाडीत 46 वर्षीय हाओ गु नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला. पोलिसांच्या मते हाओनेच लियू यांच्या हत्या केली, त्यानंतर त्यानं आत्महत्या केली. पोलिसांनी अशीही शक्यता वर्तवली आहे की, लियू आणि हाओ एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. लियू यांच्या मृत्यूनंतर पिट्सबर्गच्या विद्यापीठानं दु:ख व्यक्त केले आहे. विद्यापीठानं असेही सांगितले की कोरोना विषाणूच्या सेल्युलर यंत्रणेचा शोध घेण्याच्या अगदी जवळ लियू आले होते. वाचा- जालन्यातून आली CRPF जवानांबद्दल खळबळजनक बातमी, प्रकरण थेट पोलिसांकडे!

संबंधित बातम्या

वाचा- …तर येत्या काही वर्षात कोट्यवधी भारतीयांचा उष्णतेमुळे होणार मृत्यू रशियामध्येही दोन डॉक्टरांचा मृत्यू, एक जखमी रशियातील रुग्णालयाच्या खिडकीमधून पडून दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं साऱ्या जगाला हादरून सोडलं आहे. यातील एक डॉक्टराची प्रकृती गंभीर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिन्ही डॉक्टरांना कोरोना व्हायरस संदर्भात गोपनिय माहिती मिळाली होती. तसेच, या तिघांनी सुरक्षा उपकरणांची कमतरता याबाबत सरकारला सवाल केला होता. गेल्या आठवड्यांत, संपूर्ण रशियामधील वैद्यकीय कर्मचार्‍यांनी संसर्ग नियंत्रण प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आणि संरक्षणात्मक उपकरणांच्या अभावाचा प्रश्न उपस्थित केला होता. ज्यामुळे डझनभर रुग्णालयातील विषाणूंच्या संसर्गावर परिणाम झाला. अनेक डॉक्टरांनी तक्रार दिल्यानंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिल्याचेही म्हटले आहे. सध्या पोलीस या तीन डॉक्टरांनी आत्महत्या केली की त्यांचा खून करण्यात आला, याचा तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या