कोरोनाव्हायरस या अदृश्य रोगाशी सारं जग दोन हात करत असताना आता आणखी एक रोगाची चाहुल लाहली आहे. या आजाराने आधीच जगातील कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे.
वॉशिंग्टन, 12 जुलै : चीन यापुढे जगाच्या कहरातून सुटणार नाही कारण त्यांचेच काही लोक अमेरिकेला त्यांचं पितळ उघड पाडण्यासाठी मदत करत आहेत. वास्तविक, वुहान लॅबचे तज्ज्ञ अमेरिकन गुप्तचर संस्थांना चीनचा पर्दाफाश करण्यास मदत करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मुख्य रणनीतिकार स्टीव्ह बॅनन यांनी दावा केला आहे की, चीनमधील वुहान प्रयोगशाळेतील तज्ज्ञ पश्चिमी इंटेलिजन्ससोबत काम करीत आहेत. त्यांनी असेही म्हटले आहे की, एजन्सी त्यांच्या मदतीने बीजिंगविरूद्ध गुन्हा दाखल करण्यास तयारी करीत आहेत. यामध्ये कोरोना विषाणू हा वुहानच्या विषाणू विज्ञान प्रयोगशाळेतून बाहेर पडला होता आणि ही बाब लपवून ठेवणे म्हणजे खुनासारखे आहे. डेली मेलच्या एका बातमीनुसार हे उघड झाले आहे. यापूर्वी हाँगकाँगच्या त़ज्ज्ञानेही तेथून पलायन केले असा आरोप केला की कोरोना विषाणू प्रथम चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेने शोधला होता, परंतु त्यांनी ते लपवून ठेवले. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत कार्यरत असलेल्या बॅनन म्हणाले की, सार्स सारख्या व्हायरससाठी लस आणि औषध तयार करण्याच्या प्रयोगादरम्यान चीनमधून हा विषाणू वुहानमधून बाहेर पडला असल्याचा शोध गुप्तहेर तयार करीत आहेत. हे वाचा- ‘कोरोनाच्या लढाईत दिल्ली सरकार फेल; क्रेडिट चोरीत मात्र केजरीवाल अव्वल’ त्यांना अशी भीती वाटते की प्रयोगशाळेत असे धोकादायक प्रयोग केले जात आहेत. ज्यास परवानगी नव्हती आणि व्हायरस काही मानवाच्या माध्यमातून किंवा चुकून प्रयोगशाळेच्या बाहेर आला. त्यांनी दावा केला आहे की डिफेक्टर्स अमेरिका, युरोप आणि ब्रिटेनच्या गुप्तचर संस्थांसह चर्चा सुरू आहे. त्यांनी शक्यता व्यक्त केली आहे की गुप्तचर संस्थांकडे इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स आहेत आणि लॅबमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यांची माहिती असून यातून मोठा पुरावा हाती लागला आहे.