JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / China helps Taliban: चीनकडून अफगाणिस्तानला मदत; पहिल्या फेरीत तालिबानला काय काय मिळालं पाहा...

China helps Taliban: चीनकडून अफगाणिस्तानला मदत; पहिल्या फेरीत तालिबानला काय काय मिळालं पाहा...

अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान सरकारला (Taliban in afghanistan receives aid from China) आता चीनचं सर्वतोपरी सहकार्य मिळत आहे. चीनने 310 लाख अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केली होती. त्या मदतीची पहिली खेप आता अफगाणिस्तानात पाठवली आहे. पाहा त्याचे PHOTOS

0107

बीजिंगहून पाठवलेली आपत्कालीन मदत सामग्री बुधवारी उशिरा काबुलला पोहोचली. अफगाणिस्तानमधील चीनचे राजदूत वांग यू यांनी बुधवारी रात्री काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे साहित्य तालिबान सरकारमधील निर्वासित व्यवहार खात्याचे कार्यवाह खलील-उर-रहमान हक्कानी यांच्याकडे सुपूर्द केलं.

जाहिरात
0207

चीनचे राजदूत वांग म्हणाले की, अफगाणी लोकांना संकटकाळात चीन मानवतावादी दृष्टिकोनातून आपत्कालीन मदत साहित्याची व्यवस्था करत आहे. हिवाळ्यातील जॅकेट्स आणि इतर साहित्य जे अफगाणिस्तानच्या लोकांना तातडीने आवश्यक आहे ते या खेपेला देण्यात आलं आहे.

जाहिरात
0307

चीनने कपड्यांबरोबर खाण्या -पिण्याची पॅकेटही अफगाणिस्तानात पाठवली आहेत. राजदूत वांग म्हणाले की, गरज पडली तर चीन अफगाणिस्तानला अन्नधान्यदेखील पुरवणार आहे.

जाहिरात
0407

सध्या अडचणींचा सामना करणाऱ्या अफगाणिस्तानच्या लोकांसाठी आपत्कालीन पुरवठा केल्याबद्दल गृहमंत्री हक्कानी यांनी चीनचे आभार मानले आहे.

जाहिरात
0507

तालिबानचे हंगामी परराष्ट्र मंत्री मुत्ताकी म्हणाले की ही मदत योग्य वेळी आली आहे. दोन्ही देशांचे संबंध नेहमीच मैत्रीपूर्ण राहिले आहेत. आता ज्या लोकांना मदतीची गरज आहे अशांना आम्ही मदत करू, असं ते म्हणाले.

जाहिरात
0607

एका आकडेवारीनुसार, या वर्षाच्या सुरुवातीपासून अफगाणिस्तानातील संघर्षामुळे 6,34,000 पेक्षा जास्त लोक विस्थापित झाले आहेत. त्याचबरोबर 2012 पासून सुमारे 55 लाख लोकांनी स्थलांतर केलं आहे.

जाहिरात
0707

जेव्हा जगातील इतर देश तालिबानवर टीका करत होते तेव्हा चीनने तालिबान सरकारला मान्यता देत आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं होतं, त्यामुळे आता तालिबानसाठी ही चीनने केलेली मदत फार महत्त्वाची मानली जात आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या