JOIN US
मराठी बातम्या / विदेश / चीनकडून गुंडगिरीला सुरुवात, भारतीय हद्दीतून केलं अल्पवयीन तरुणाचं अपहरण

चीनकडून गुंडगिरीला सुरुवात, भारतीय हद्दीतून केलं अल्पवयीन तरुणाचं अपहरण

चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली आणि अरुणाचल प्रदेशातील एका 17 वर्षांच्या तरुणाचं अपहरण केलं, असा आरोप तिथल्या खासदारांनी केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इटानगर, 19 जानेवारी: चीननं (China) भारतीय सीमेत (Indian Border) घुसखोरी करून एका भारतीय अल्पवयीन तरुणाचं (Indian youth) अपहरण (Abduction) केल्याची घटना समोर आली आहे. चीननं एकीकडे भारतासोबत चर्चा सुरू ठेवली असली तरी दुसरीकडून आपली घुसखोरीदेखील सुरु ठेवल्याचं सांगितलं जातंय. विस्तारवादी भूमिकेत असलेल्या चीनकडून सातत्यानं भारताच्या कुरापती काढल्या जात असून त्याचा फटका आता भारतातील सर्वसामान्य नागरिकांना बसू लागल्याचं चित्र आहे.   अल्पवयीन मुलाचं अपहरण चीननं भारताच्या सीमेत घुसखोरी करून अरुणाचल प्रदेशातील एका तरुणाचं अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. चीनच्या पीएलए म्हणजेच पीपल्स लिबरेशन आर्मीनं हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांग जिल्ह्यातून हे अपहरण करण्यात आलं असून एका 17 वर्षांच्या अल्पवयीन तरुणाला चिनी सैनिकांनी उचलून नेल्याचा आरोप या भागातील खासदार तापीर गाओ यांनी केला आहे.  

संबंधित बातम्या

चीनचा विस्तारवाद चीनने पेंगॉग तलावाच्या परिसरात पुलाचं बांधकाम सुरू केल्याची छायाचित्रे काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. चीन भारताच्या सीमेजवळील भागात बांधकाम करत असून भारतावरील दबाव वाढवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 1 जानेवारीला भारत आणि चीन या दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांना भेटले होते आणि शुभेच्छा देत मिठाईचं वाटप केलं होतं. मात्र त्यानंतर आता चीननं आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली असून अल्पवयीन मुलाचं अपहरण करून आपले इरादे उघड केल्याचं दिसून येत आहे.   हे वाचा -

चीनकडून प्रतिक्रिया नाही अरुणाचल प्रदेशातील एका खासदारांनी केलेल्या या आरोपांना अद्याप चीनकडून कुठलंच प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाही. नेमका काय प्रकार घडला  आणि या तरुणाचं अपहरण का करण्यात आलं आहे, याचा तपास सध्या स्थानिक पोलीस आणि यंत्रणांनी सुरू केला आहे. मात्र आतापर्यंत सैनिकांपुरता मर्यादित असणारा दोन्ही देशांतला संघर्ष हा सर्वसामान्य माणसांपर्यंत येऊन ठेपल्याचं या घटनेतून दिसून आलं आहे. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या