या मास्कची प्रमुख वैशिष्ट्य हे आहे की हा हवेतील 95% दूषित कणांपासून आपलं संरक्षण करतो. सर्जिकल मास्कपेक्षा हा मास्क जास्त प्रभावी असतो.
बिजिंग, 28 मार्च : जगभरात पसरलेल्या कोरोनाचा संकटाचं मूळ असलेल्या चीनमध्ये मात्र आता कोरोनाचं थैमान आटोक्यात आलं आहे. याचा फायदा चीन आता घेत आहे. जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. 15 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लोखो लोक जगभरातील वेगवेगळ्या देशात उपचार घेत आहेत. भारतात तर 800 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर महाराष्ट्रात 159 वर आकडा पोहोचला आहे. जगाला कोरोना व्हायरस देणारा चीन मात्र आता पैसे कमवण्याच्या मागे लागला आहे. यासाठी चीननं आता कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी मास्क मोठ्या प्रमाणात तयार करत आहे. हे मास्क चीन जगभरात निर्यात करून त्यातून आपल्या अर्थव्यवस्थेची घडी बसवत आहे. हे वाचा- असा दिसतो भारतात थैमान घालणारा ‘कोरोना’, पुण्याच्या लॅबमध्ये काढला फोटो जगभरात चार दशलक्षांहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात मास्कची मागणी वाढली आहे. दक्षिणपूर्व गुआंग्डोंग प्रांतातील डोंगगुआन शहरातील एन 95 मुखवटा बनवणाऱ्या कंपनीचे सेल्स मॅनेजर शी चुनघुई म्हणाले, ‘मास्क मशीन खरंच एक नोट प्रिंटिंग मशीन बनली आहे. जिथे पूर्वी एक ते दोन टक्क्यांपर्यंत मास्कचा फायदा होत असे, तो आता वाढून अनेक टक्के झाला आहे. दिवसाला 60,000 ते 70,000 मास्क बनविणे म्हणजे तितक्या नोटा छापणे होय’ चीनमध्ये दरदिवशी 11.6 कोटींचे मास्क तयार होत आहेत. या कोरोना व्हायरसची सुरुवात मध्य चीनमधील वुहान प्रांतातून झाली होती. त्यानंतर हा व्हायरस झपाट्यानं जगभरात पसरत होता. चीनमध्ये हा व्हायरस आटोक्यात आला मात्र जगभरात त्यानं थैमान घातलं आहे. चीनने सर्वात जास्त इटलीमध्ये मास्क निर्यात करायला सुरुवात केली. त्यानंतर मास्कचं उत्पादन वाढवून आता जगभरात त्यांची निर्यात करत आहेत. हे वाचा- PHOTOS : कोरोनाबाधितांचे नमुने एअरलिफ्ट, वायू दल आले मदतीला धावून!