JOIN US
मराठी बातम्या / विदेश / कोरोनापेक्षा अज्ञात व्हायरसचा जगाला जास्त धोका, दिग्गज शास्त्रज्ञांनी दिला इशारा

कोरोनापेक्षा अज्ञात व्हायरसचा जगाला जास्त धोका, दिग्गज शास्त्रज्ञांनी दिला इशारा

चीनची ‘बॅट व्हुमन’ म्हणून ओळख असलेल्या शी झेंगली यांनी अज्ञात व्हायरसपासून सावध राहण्यास सांगितले आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीजिंग, 26 मे : कोरोनाव्हायरसनं जगात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना अद्याप यावर कोणतीही लस किंवा औषध मिळालं नाही आहे. या सगळ्यात शास्त्रज्ञांनी आता आणखी एका व्हायरसचा जगाला धोका असल्याचे संकेत दिले आहेत. चीनमधील एक प्रमुख व्हायरोलॉजिस्टने नवीन व्हायरसच्या हल्ल्याबाबत सांगितले आहे. चीनच्या संदिग्ध संस्था वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे उपसंचालक शी झेंगली यांनी चीनच्या सरकारी टेलिव्हिजनवर बोलताना नवीन व्हायरसबाबत इशारा दिला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार झेंगली यांनी वटवाघुळात असलेल्या कोरोनाव्हायरसवर संशोधन केले होते. याच कारणास्तव त्यांना चीनची ‘बॅट व्हुमन’ म्हणून ओळख आहे. शी झेंगली यांनी व्हायरसबाबत केलेल्या संशोधनावर सरकार आणि वैज्ञानिकांनी पारदर्शक राहिले पाहिजे, असे सांगितले. तसेच, विज्ञानाचे राजकारण केले जाते तेव्हा ते फार वाईट असते, अशी खंतही बोलून दाखवली. सीसीटीएनशी बोलताना शी झेंगली यांनी, जर आपल्याला पुढील संक्रमक आजारापासून वाचायचं असेल तर जास्तीत जास्त माहिती गोळा करावी लागेल. प्राण्यांमध्ये असलेल्या इतर अज्ञात व्हायरसबाबत माहिती करून घ्यावी लागेल. वाचा- आनंदाची बातमी! US च्या या कंपनीने सुरू केलं कोरोनाच्या लसीचं माणसांवर ट्रायल शी झेंगली यांनी यावेळी सांगितले की, जर आपण अज्ञात व्हायरसचा अभ्यास केला नाही तर आणखी एक संसर्गजन्य रोग पसरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जगातील अनेक देश वुहानमध्ये असलेल्या चिनी लॅबकडे संशयाने पाहत आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनीही सांगितले की कोरोना विषाणूचा संसर्ग चिनी लॅबमधून पसरल्याचा मोठा पुरावा आहे. मात्र चीन आणि वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी अशा प्रकारचे आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. लॉकाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं वाचा-‘या’ देशाची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; आता रुग्णालयात राहिला फक्त एक कोरोना

News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
टॉप व्हिडीओज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या