लंडन 25 ऑगस्ट : माणूस (Human) आणि प्राण्यांच्या (Animals) प्रेमाच्या अनेक कथा जगभरात प्रसिद्ध आहेत. प्रगत मानवाने प्राणी पाळण्याचा सिलसिला सुरु केला आणि या प्राण्यांनी अनेकदा माणसाचे प्राण वाचवण्याच्या घटना घडल्या आहेत. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत 70 फूट खोल (Vally) दरीत कोसळून एका कालव्यापाशी जाऊन पडलेल्या आजाबाईंचे (aged woman) प्राण एका मांजरीमुळे (Cat) वाचल्याचं दिसून आलं आहे. अशी घडली घटना ही घटना आहे इंग्लंडमधल्या कॉर्नवॉल भागातील. ग्रामीण भागात राहणाऱ्या एक 83 वर्षीय आजीबाई चालता चालता एका दरीत कोसळल्या. कॉर्नवॉल हा दऱ्याखोऱ्यांचा आणि झऱ्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या प्रदेशात जागोजागी उंचच उंच डोंगर आणि खोल दऱ्या पाहायला मिळतात. अशाच एका दरीत आजीबाई कोसळल्या आणि त्या कुठे गेल्यात, हे कुणालाच समजेना. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या 38 वर्षाच्या तमर लॉन्गमुईरनं त्यांना शोधायला सुरुवात केली. आजूबाजूच्या शेतात, शेजाऱ्यांकडे आणि इकडेतिकडे त्याने चौकशी केली. आजीबाई कुठेच नव्हत्या. त्यानंतर मात्र मामला गंभीर असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि शेजाऱ्यांसह त्यांनी आजीबाईंचा शोध सुरू केला. शोध सुरू असताना तमरचं लक्ष आजींच्या मांजरीकडं गेलं. ती मांजर एका दरीच्या काठावर उभी राहून सारखी खाली पाहत होती. तमर त्या मांजरीपाशी जाताच मांजर जोरजोरात ओरडू लागली आणि दरीच्या दिशेनं पाहू लागली. त्यामुळे तमरसह सर्वांनाच आजी दरीत असावी, असा संशय आला. सर्वांनी शांत राहून आजींना हाक मारून पाहिली. खालून आजींनी ओ दिल्यानंतर त्या खालीच असल्याची खात्री पटली. हे वाचा - भाजप नगरसेवकाची मित्राच्या पत्नीकडे अजब मागणी; महिलेनं धू-धू धुतलं, पाहा VIDEO त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी दोर आणि इतर साधनं घेऊन दरीत उतरून आजीबाईंची सुखरूप सुटका केली. या घटनेत त्यांना किरकोळ जखमा झाल्या असून उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मांजरीमुळे आजींचे प्राण वाचल्याची चर्चा सध्या पंचक्रोशीत रंगत आहे.