JOIN US
मराठी बातम्या / विदेश / मास्क काढून पार्टी करणाऱ्यांना विमान कंपन्यांचा इंगा; परतीच्या प्रवासासाठी NO ENTRY

मास्क काढून पार्टी करणाऱ्यांना विमान कंपन्यांचा इंगा; परतीच्या प्रवासासाठी NO ENTRY

चार्टर्ड विमानाने पार्टीला चाललेल्या काही कॅनेडियन नागरिकांनी विमानातच मास्क काढून पार्टी केली. त्याची अशी काही शिक्षा त्यांना मिळतेय की ती जन्मात विसरणार नाहीत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मेक्सिको, 10 जानेवारी: जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी (Year End) मेक्सिकोला (Mexico) चाललेल्या काही कॅनडाच्या (Canada) प्रवाशांनी (Passengers) चार्टर्ड फ्लाईट (Chartered flight) बुक केलं होतं. मेक्सिकोला पोहोचण्यापूर्वी विमानातच सर्वांनी मास्क काढून जोरदार (Maskless party) पार्टी केली होती. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता सर्व विमान कंपन्यांनी या ‘Maskless पार्टीबहाद्दर’ नागरिकांना आपल्या विमानातून परत कॅनडाला न्यायला स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे हे सगळे अजूनही मेक्सिकोतच अडकून पडले आहेत. विमानातच केली पार्टी 31 डिसेंबरची पार्टी करण्यासाठी काही कॅनेडियन नागरिकांचा ग्रुप मेक्सिकोला जाणार होता. मेक्सिकोत जात असतानाच विमानातच सर्वांना पार्टी करण्याची हुक्की आली आणि सर्व नियम बाजूला सारत नागरिकांनी चेहऱ्यावरचे मास्क काढले आणि पार्टीला सुरुवात केली. विमानाला जणू एखाद्या रेव्ह पार्टीचं स्वरुप आलं होतं. या घटनेचा व्हिडिओ बघता बघता कॅनडा आणि मेक्सिको या दोन्ही देशांत व्हायरल झाला आणि कोरोनाबाबतचे सर्व नियम मोडणाऱ्या या नागरिकांना पुन्हा मायदेशी परत न नेण्याचा निर्णय सर्व विमान कंपन्यांनी घेतला. सनविंग एअरलाईन्स या कंपनीच्या विमानानं हे नागरिक मेक्सिकोत आले होते. या कंपनीनंही प्रवाशांना परत न नेण्याचा निर्णय घेतला आहे. पार्टी करणारे कोरोना पॉझिटिव्ह पार्टी केलेल्यांपैकी जवळपास 30 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती याच ग्रुपची सदस्य असणाऱ्या 19 वर्षांच्या रेबेका नावाच्या तरुणीनं कॅनडाच्या माध्यमांना दिली आहे. या सर्व नागरिकांना सध्या मेक्सिकोत क्वारंटाईन करण्यात आलं असून त्यांच्या सुटकेचे सर्व मार्ग सध्या बंद आहेत. यातील काही नागरिकांनी स्वतःची कोरोना टेस्ट निगेटिव्ह यावी, यासाठी स्वतःच्या नाकात व्हॅसलिन भरून ठेवलं होतं, अशी माहितीही समोर आली आहे.   हे वाचा -

पंतप्रधानांनी केला निषेध कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या सर्व नागरिकांचं वर्तन बेजबाबदारपणाचं होतं, अशी टीका केली आहे. त्यांनी कोरोनाबाबच घालून दिलेले सर्व निकष ओलांडले असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या