JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Justin Trudeau: कॅनडाच्या पंतप्रधानांनी दिली स्वामीनारायण मंदिराला भेट; हिंदू संस्कृतीचं केलं कौतुक

Justin Trudeau: कॅनडाच्या पंतप्रधानांनी दिली स्वामीनारायण मंदिराला भेट; हिंदू संस्कृतीचं केलं कौतुक

Justin Trudeau : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी नुकतीच टोरंटटोमधल्या बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिली. तिथं त्यांनी महंतांचं दर्शन व आशीर्वाद घेतला.

जाहिरात

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो सतत काहीना काही कारणामुळे चर्चेत असतात. कॅनडातील अनिवासी भारतीयांमध्येही ते फार लोकप्रिय आहेत. नुकतीच त्यांनी टोरंटो येथील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी कॅनडा दौऱ्यावर असलेल्या परमपूज्य महंत स्वामी महाराज यांची भेट घेतली. पूज्य गुणसागरदास स्वामी, पूज्य विराटस्वरूपदास स्वामी आणि बीएपीएसच्या संचालक मंडळानं पंतप्रधान ट्रूडो यांचं स्वागत केलं. मंदिराच्या आत त्यांनी महंत स्वामी महाराज यांची भेट घेतली. त्यावेळी महंतांनी हिंदू संस्कृतीनुसार पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला.

महंत स्वामी महाराजांनी पंतप्रधानांच्या मनगटाभोवती ‘नाडा छडी’ हा पवित्र धागा देखील बांधला. हा धागा एकता आणि मैत्रीच्या सामायिक मूल्यांचं प्रतीक मानला जातो. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी आणखी चार ‘नाडा छडी’ पंतप्रधानांना देण्यात आल्या. महंत स्वामी महाराजांनी पंतप्रधानांना, आशीर्वाद कोरलेल्या सत्संग दीक्षा ग्रंथाची एक प्रत भेट दिली. याशिवाय, त्यांना सत्संग दीक्षा ग्रंथाची हस्तलिखितं, एक हस्तलिखित कार्ड आणि ‘इन लव्ह, अॅट इज’ या पुस्तकाची प्रतही देण्यात आली, ज्यात प्रमुख स्वामी महाराजांच्या शिकवणीचा समावेश आहे. या भेटीत विचारांची सुसंवादी देवाण-घेवाण झाली.

मंदिरातील पवित्र वातावरणात पंतप्रधानांनी सर्व कॅनेडियन लोकांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. ते श्री नीलकंठ वर्णीच्या अभिषेक विधीत सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी सभामंडपात जाऊन शुभ सोहळ्यासाठी जमलेल्या श्रद्धाळू अनुयायी आणि हितचिंतकांच्या मेळाव्याला संबोधित केलं. पंतप्रधान ट्रुडो यांनी बीएपीएस मंदिर समुदायाचे आभार मानले. कॅनडातील बीएपीएसच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त महंत स्वामी महाराज कॅनडामध्ये आले, त्याबद्दल देखील पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

50 वर्षांच्या काळात बीएपीएस समुदायानं कॅनडामध्ये शांती आणि दानधर्माची शिकवण दिली. हिंदू संस्कृती आणि इतिहासातील मूल्ये देशामध्ये रुजवली, याबद्दल पंतप्रधान ट्रुडो यांनी 40 मिलियन कॅनडियन नागरिकांच्या वतीनं बीएपीएस समुदायाचे आभार मानले.

जेव्हा प्रत्येकजण सारखाच दिसतो आणि सारखाच विचार करतो तेव्हा एकता निर्माण होणं, ही सोपी बाब असते. पण, सांस्कृतिक आणि वैचारिक फरक विसरून एकता निर्माण करणं, कठीण काम आहे. बीएपीएस समुदायानं हे कठीण काम पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केलं. मेळाव्यानंतर समाजातील इतर नेते आणि बीएपीएस स्वयंसेवकांनी पंतप्रधानांची भेट घेतली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या