केबल कार डोंगरावरुन जात असताना केबल तुटून थेट खाली कोसळली.
रविवारी इटलीच्या पर्वतीय भागात केबल कारचा अपघात झाला असून यात 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य : reuters)
या केबल कारमध्ये पर्यटकांसह काही स्थानिक नागरिकही होते. समुद्रसपाटीपासून 1400 मीटर उंचीवरुन ही केबल कार कोसळल्याची माहिती आहे. (फोटो सौजन्य : reuters)
मृत्यू झालेल्या पर्यटकांचं वय किंवा ते कोणत्या देशातून आले होते याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याची माहिती आहे. (फोटो सौजन्य : reuters)
कोरोना व्हायरसच्या निर्बंधांनंतर ही केबल कार नुकतीच सुरू करण्यात आली होती. या केबल कारमधून प्रसिद्ध Maggiore लेकवरील दृष्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात.
ही केबल कार सर्विस पहिल्यांदा 1970 मध्ये सुरू झाली होती. या प्रवासात 20 मिनिटांचा कालावधी लागतो.