यमन : बसने प्रवास करणाऱ्यांवर काळाने मोठा आघात केला. कोणी शाळेत जात असेल कोणी बाहेर गावी निघालं असेल तर कुणी कामानिमित्ताने बाहेर, या सगळ्यांना मृत्यूनं अचानक भयानक रस्त्यात गाठलं आणि मोठा अनर्थ घडला. धावत्या बसने अचानक पेट घेतला आणि 20 प्रवाशांनी जागीच आपले प्राण गमवले. तर या भीषण अपघातात 30 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुलावर आदळल्यानंतर आणि उलटल्यानंतर बसला आग लागली. यामध्ये बस पूर्णपणे जळालेली दिसत आहे. गाडीचे ब्रेक अचानक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ही घटना रमजानच्या पहिल्या आठवड्यात घडली. जेव्हा बरेच लोक रमजानच्या महिन्यात कुटुंब आणि मित्रांसह रात्रीच्या जेवणाचा आनंद घेण्यासाठी प्रवास करतात. सौदी अरेबियाच्या नैऋत्य भागात सोमवारी प्रवाशांनी भरलेल्या बसला अपघात होऊन 20 जणांचा मृत्यू झाला. सौदी अरेबियाच्या राज्य माध्यमांनी सांगितले की, अपघातात इतर 30 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.