JOIN US
मराठी बातम्या / विदेश / डिलिव्हरीवेळी लेबर रुममध्ये दीरही राहिल हजर; पतीच्या हट्टामुळे पत्नीचा संताप

डिलिव्हरीवेळी लेबर रुममध्ये दीरही राहिल हजर; पतीच्या हट्टामुळे पत्नीचा संताप

लेबर रूममध्ये दिराच्या उपस्थितीबद्दल महिलेने आक्षेप नोंदवला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : महिलेसाठी डिलिव्हरीचा (Delivery) क्षण हा अत्यंत खास असतो. मात्र यावेळी वेदनादेखील खूप होतात. मात्र पतीची साथ असेल तर या वेदना कमी जाणवू लागतात. एका महिलेने आपला असाच अनुभव रेडिटवर शेअर केला आहे. अर्थात यावेळी पत्नीने आपल्या पतीवर संताप व्यक्त केला. यामागे पतीच कारणीभूत होता. पतीने व्यक्त केलेल्या इच्छेमुळे महिला संतापली. पतीने सांगितलं की, डिलिव्हरीच्या वेळी लेबर रूममध्ये महिलेचा दिर म्हणजे तिच्या पतीचा भाऊ देखील हजर राहील. या गोष्टीवरुन महिलेने संताप व्यक्त केला.  (brother in law will also be present in the labor room at the time of delivery Wife anger due to husbands demand) लेबर रूममध्ये पत्नीने दिराच्या उपस्थितीमागील कारण विचारलं.. महिलेने रेडिटवर लिहिलं की, माझ्या गर्भात जुळी मुलं आहेत. 31 आठवड्याची प्रेग्नेंन्सी आहे. आम्ही एक वर्षांपासून मुलासाठी प्रयत्न करीत होतो. माझ्यासाठी प्रेग्नेन्सीचा काळ खूप कठीण आहे. माझा दीर मेडिकलचं शिक्षण घेत आहे. यामुळे माझ्या पतीने दिरालाही सोबत ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. माझा पती लहानपणीचा मित्र आहे. आम्ही एकत्रच मोठे झालो आहे. हे ही वाचा- गर्भकळा सुरू झाल्यानंतर खासदार महिला सायकलवर पोहोचली रुग्णालयात लेबर रूममध्ये दिराच्या उपस्थितीबद्दल महिलेने आक्षेप नोंदवला. पती म्हणाला की मला त्यावेळी एक अशी व्यक्ती हवी आहे जी मला मदत करू शकेल. रेडिटवर महिलेची पोस्ट वाचून लोकांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिलं की, मुलाला जन्म देणं हे खूप कठीण काम आहे. अशात तुम्ही कोणाच्याही दबावाखाली येऊ नका. तर दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं की, तू पतीला घटस्फोट दे…अशावेळीदेखील तो नियम व अटी ठेवतो. महिलेने सांगितलं की, लेबर रूममध्ये तिला आपल्या पतीसमोरच लाज वाटेल, असावेळी जर तिथं दिर असला तर तिची अवस्था भयंकर होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या