JOIN US
मराठी बातम्या / विदेश / ROBO Taxi... भारताच्या शेजारच्या या देशात धावू लागली चालकविरहित टॅक्सी

ROBO Taxi... भारताच्या शेजारच्या या देशात धावू लागली चालकविरहित टॅक्सी

आपण अॅपवरून कॅब बुक केल्यास ड्रायव्हर काही वेळातच तुम्हाला हवं तेथे गाडी घेऊन पोहोचतो. मात्र, आता या देशात टॅक्सी बुक केल्यावर, ती तुमच्याकडे पोहोचेल, पण ड्रायव्हरशिवाय…

जाहिरात

Photo : twitter

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 एप्रिल : कल्पना करा की, तुम्ही घरातून बाहेर पडण्यासाठी अॅपवरून कॅब बुक केली आणि सफाईदार वळणं घेत ती तुमच्या दारातही आली. पण आत बसताच कळलं की, यात तर चालकच नाही. ड्रायव्हर गेला कुठे हे शोधायचा विचार मनात येतोय न येतोय तोच गाडी पुन्हा सुरू झाली आणि चालकाशिवायच चालू लागली आणि तुम्हाला इच्छिच ठिकाणी घेऊन जाण्यासाठी रस्त्यावरून निघालीही.. होय, ही आतापर्यंत फक्त विचारांत असणारी गोष्ट आता चीनमध्ये प्रत्यक्षात आली आहे. Pony.ai सेवा सुरू केली चीनमध्ये ऑटोनॉमस ड्रायव्हिंग स्टार्टअप कंपनी Pony.ai ने ड्रायव्हरलेस रोबोटिक सेवा सुरू केली आहे. कंपनीने Baidu या सर्च इंजिनच्या सहकार्याने ही सेवा सुरू केली आहे. Baidu ने अलीकडच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (Artificial intelligence technology) आणि सेल्फ-ड्रायव्हिंगमध्ये (self driving) मोठी गुंतवणूक केली आहे. हे वाचा -  तुम्ही कधी बसणार का अशा परीक्षेला? चीनमध्ये 9 तासांचा असतो पेपर! चीन सरकारने परवाना दिला ब्लूमबर्गच्या बातमीनुसार, Pony.ai ला या रोबो टॅक्सी सेवेसाठी चीन सरकारकडून परवानाही मिळाला आहे. या टॅक्सीसाठी आता चालकाची गरज भासणार नाही, असा विशेष उल्लेख परवान्यात करण्यात आला आहे. ग्राहक कंपनीच्या अॅपवरून ही कॅब सेवा बुक करू शकतात. याबाबत Baidu तर्फे एक ट्विटही केलं आहे.

संबंधित बातम्या

ही सेवा अशा प्रकारे कार्य करेल ग्राहक कंपनीच्या अॅपवर ड्रायव्हरलेस कॅब (driverless cab) बुक करतील. कॅब ग्राहकापर्यंत पोहोचल्यावर त्याला कारचा क्यूआर कोड (QR code) स्कॅन करावा लागेल. यानंतर, टच स्क्रीनवर कार जिकडे घेऊन जायची आहे, ते स्थान निवडावं लागेल आणि त्यानंतर कार स्वतः चालेल आणि स्वाराला त्याच्या गंतव्यस्थानावर घेऊन जाईल. यासाठीचं पेमेंटही डिजिटल पद्धतीनं केलं जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या